जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING : 24 तासात ठार मारू, रुपाली चाकणकर यांना फोनवरून धमकी

BREAKING : 24 तासात ठार मारू, रुपाली चाकणकर यांना फोनवरून धमकी

 
राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयाला फोन करुन एका अज्ञात व्यक्तीने रूपाली चाकणकर यांना पुढील 24 तासात जीवे मारू असा इशारा दिला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयाला फोन करुन एका अज्ञात व्यक्तीने रूपाली चाकणकर यांना पुढील 24 तासात जीवे मारू असा इशारा दिला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयाला फोन करुन एका अज्ञात व्यक्तीने रूपाली चाकणकर यांना पुढील 24 तासात जीवे मारू असा इशारा दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 मे : राष्ट्रवादीच्या नेत्या आणि  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोन (threatened call) करून चाकणकर यांना पुढील 24 तासात जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीच्या फोन कॉलमुळे एकच खळबळ उडाली आहे. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा कारभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका लावला आहे. राज्यात महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या घडामोडींवर रुपाली चाकणकर यांनी लगेच दखल घेतलेली आहे. अशातच  रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा फोन कॉल आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयाला फोन करुन एका अज्ञात व्यक्तीने रूपाली चाकणकर यांना पुढील 24 तासात जीवे मारू असा  इशारा दिला आहे. ( शाळा आहे ही, खरं वाटेल? वाळवंटात कुणी आणि कशी बांधलीये Photo पाहून व्हाल थक्क ) राष्ट्रीय महिला आयोगाकडून राज्य महिला आयोगाला धमकीचा फोन आल्याची माहिती दिली आहे. धमकीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. धक्कादायक म्हणजे, धमकीचा मागील काही दिवसांतील हा तिसरा फोन आहे. रुपाली चाकणकर यांना याआधीही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे प्रकार घडले होते. पण, चाकणकर यांनी धमकी देणाऱ्यांना भीक घातली नाही. ( UPSC टॉपर म्हणते, “पहिल्या नंबरची अपेक्षा नव्हती!” वाचा कोण आहे श्रुती शर्मा ) आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात फोन करून या अज्ञात व्यक्तीने धमकी दिली आहे. या प्रकरणाची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. महिला आयोगाकडून तातडीने स्थानिक पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे.  रुपाली चाकणकर यांना कुणी फोन केला, या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. मात्र, महिला आयोगाच्या अध्यक्षांना फोनवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात