Home /News /career /

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! सर्व विद्यापीठांच्या परीक्षांबाबत हाय कोर्टाचे महत्त्वपूर्ण आदेश

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! सर्व विद्यापीठांच्या परीक्षांबाबत हाय कोर्टाचे महत्त्वपूर्ण आदेश

राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन

राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन

राज्यातील निरनिराळ्या विद्यापीठांच्या परीक्षा निरनिराळ्या पद्धतीनं होतील. तसंच परीक्षांचे निकालही निरनिराळ्या पद्धतीनं लागतील. हे विद्यार्थ्यांसाठी बरोबर नाही हे कोर्टाच्या लक्षात आलं आहे.

    मुंबई, 30 मे: गेल्या काही दिवसांपासून राज्यातही कोरोना पूर्णपणे नाहीसा झाला आहे असं चित्रं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कॉलेजेसही ऑफलाईन (Offline Colleges in Maharashtra) पद्धतीनं सुरु झाले आहेत. मात्र गेली दोन वर्ष ऑनलाईन शिक्षण (Online Education) घेतल्यामुळे ऑफलाईन परीक्षेला (Offline exams in Maharashtra) विद्यार्थ्यांचा विरोध होता. मात्र राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन (Offline exams in All universities in Maharashtra) पद्धतीनं घेण्यात येणार आहे. उच्च शिक्षणमंत्री आणि कुलगुरू यांच्या बैठकीच्या आधीच नागपूर विद्यापीठानं ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन परीक्षांचा (exam) आढावा घेतला होता. त्यात त्यांनी सर्व विद्यापीठांमध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत सूचना केली होती. मात्र या निर्णयाला अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही कोणत्याही विद्यापीठाकडून याबाबत ठोस निर्णय झाला नव्हता. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात होते. Career Tips: तुम्हीही ऑडिओलॉजिस्ट होऊन कमावू शकता भरघोस पैसे; असं करा करिअर? लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव सुटला. तसंच ऑनलाईन अभ्यासही योग्यप्रकारे होऊ शकला नाही. परीक्षेत कोरोना संसर्गाचा धोका विद्यार्थ्यांना वाटत होता. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्यासाठी निरनिराळ्या विद्यापीठतच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं होतं. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर काही दिवसांपूर्वी नागपूर, गोंडवाना आणि लातूर विद्यापीठांनी MCQ सह ऑफलाईन परीक्षा घेण्याचं निश्चित केलं होतं. इतर कोणत्याही विद्यापीठांचा अशा पद्धतीनं परीक्षा घेण्याबाबत निर्णय आला नाहीये. काही विद्यापीठांनी लेखी परीक्षा घेण्याचाही निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे राज्यातील निरनिराळ्या विद्यापीठांच्या परीक्षा निरनिराळ्या पद्धतीनं होतील. तसंच परीक्षांचे निकालही निरनिराळ्या पद्धतीनं लागतील. हे विद्यार्थ्यांसाठी बरोबर नाही हे कोर्टाच्या लक्षात आलं आहे. तुमच्या मुलांमध्येही अशी लक्षणं दिसताहेत? असू शकतं डिप्रेशनचं कारण; व्हा सावध म्हणूनच राज्यातील सर्व विद्यापीठांनी सर्व परीक्षा सर्व पद्धतीनंच घ्याव्यात असा निकाल आज उच्च न्यायालयानं दिला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर होऊन एकमतानं आणि एकाच पद्धतीनं परीक्षा होणार आहेत.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Exam Fever 2022, Exam result, High Court

    पुढील बातम्या