Home /News /national /

निवडणुकीआधी सेनेला ED चा धक्का! आता प्रियंका गांधींचा नंबर? या जिल्ह्यात Monsoon अलर्ट TOP बातम्या

निवडणुकीआधी सेनेला ED चा धक्का! आता प्रियंका गांधींचा नंबर? या जिल्ह्यात Monsoon अलर्ट TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 15 जून : विधान परिषद निवडणूक (vidhan parishad election maharashtra 2022) तोंडावर आली असताना आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या मागे ईडीची (ed) पिडा लागली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald case) काँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांची सलग दोन दिवस ईडीने (ed) चौकशी केली. शिवसेनेनं (shivsena) निवडणुकीच्या दोन दिवसांआधीच आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्याची व्यवस्था केली आहे. पंतप्रधान मोदी (pm narendra modi) यांच्या उपस्थितीत देहूच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रम पार पडला. पण, यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना भाषणच करू न दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 15 जूनपर्यंत मॉन्सून विदर्भाच्या काही भागात दाखल होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. यासह देशविदेशातील घडामोडी काही मिनिटांत वाचा. विधान परिषदेच्या तोंडावर अनिल परबांना ईडीची नोटीस विधान परिषद निवडणूक (vidhan parishad election maharashtra 2022) तोंडावर आली असताना आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या मागे ईडीची (ed) पिडा लागली आहे. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab)  यांना ईडीने समन्स बजावला आहे. ईडीने अनिल परब यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. आता प्रियांका गांधींचा नंबर? नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald case) काँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांची सलग दोन दिवस ईडीने (ed) चौकशी केली. मंगळवारी दुसऱ्या दिवशी तब्बल 10 दहा तास चौकशी केल्यानंतर सुटका केली आहे. बुधवारी पुन्हा एकदा चौकशीला बोलावण्याची शक्यता असून प्रियांका गांधी यांनाही बोलावण्याची चिन्ह आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राज्यसभेत शिवसेनेला ज्यांनी दिला दगा? विधानपरिषदेसाठी काँग्रेसची त्यांच्याकडेच धाव! काही दिवसांवर विधान परिषद निवडणूक (Vidhan Parishad Election) येऊन ठेपली आहे. त्यात भाजपने इथंही सर्व उमेदवार विजयी करू असा निर्धार बोलून दाखवला आहे. परिणामी आता आघाडी मतांची जुळवाजुळव करताना पाहायला मिळत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शिवसेनेच्या आमदारांची पुन्हा हॉटेलवारी राज्यसभा निवडणुकीमध्ये पानिपत झाल्यामुळे शिवसेनेनं विधान परिषद निवडणुकीसाठी (vidhan parishad election maharashtra 2022) मोर्चबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेनं (shivsena) आपल्या आमदाराला निवडणुकीच्या दोन दिवसांआधीच आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्याची व्यवस्था केली आहे. तर भाजपनेही पाचवा उमेदवार कसा निवडून आणावा यासाठी बैठक बोलावली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. संजय राऊतांनी घेतला वेगळाच संशय, म्हणाले.. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) यांचे जिल्ह्यात कार्यक्रम सुरू आहे आणि त्यांना बोलू दिले नाही म्हणून पंतप्रधानांनी आश्चर्य व्यक्त केलं अशा प्रकारचे चित्र मी पाहिले. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. हा महाराष्ट्राचा अपमान, सुप्रिया सुळे भडकल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या उपस्थितीत देहूच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रम पार पडला. पण, यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना भाषणच करू न दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिलं पण राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा alert मॉन्सूनने मागच्या 24 तासांत निम्मा महाराष्ट्र व्यापल्याचे हवामान खात्याकडून (imd alert) सांगण्यात आले. 15 जूनपर्यंत मॉन्सून विदर्भाच्या काही भागात दाखल होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Anil parab, ED

    पुढील बातम्या