जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / राज्यसभेत शिवसेनेला ज्यांनी दिला दगा? विधानपरिषदेसाठी काँग्रेसची त्यांच्याकडेच धाव!

राज्यसभेत शिवसेनेला ज्यांनी दिला दगा? विधानपरिषदेसाठी काँग्रेसची त्यांच्याकडेच धाव!

राज्यसभेत शिवसेनेला ज्यांनी दिला दगा? विधानपरिषदेसाठी काँग्रेसची त्यांच्याकडेच धाव!

Vidhan Parishad Election : अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दोनच अर्ज मागे घेतले गेल्याने आता निवडणूक अटळ मानली जात आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 जून : राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) बहुमत असूनही पराभव स्वीकारावा लागल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला होता. विशेषतः हा पराभव शिवसेनेच्या जास्तच जिव्हारी लागला. त्यामुळे शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत काही आमदारांनी मदत केली नसल्याचे सांगत त्यांची नावे जाहीर केली होती. आता काही दिवसांवर विधान परिषद निवडणूक (Vidhan Parishad Election) येऊन ठेपली आहे. त्यात भाजपने इथंही सर्व उमेदवार विजयी करू असा निर्धार बोलून दाखवला आहे. परिणामी आता आघाडी मतांची जुळवाजुळव करताना पाहायला मिळत आहे. कसं आहे विधान परिषदेचं गणित? अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवाजीराव गर्जे यांनी आपला अर्ज मागे घेतला. शिवसेनेनं विधानपरिषद निवडणुकीसाठी सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना उमदेवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजितदादांना बोलू न दिल्याबद्दल संजय राऊतांनी घेतला वेगळाच संशय, म्हणाले… भाजपकडून विधानपरिषदेसाठी प्रविण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी दिली गेली आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर 11 अर्ज कायम राहिल्यानं विधानपरिषदेची निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. यात महाविकास आघाडीचे 6 तर भाजपचे 5 उमेदवार आहेत. त्यामुळे एक उमेदवार आघाडी किंवा भाजप यांचा पडणार आहे. काँग्रेसकडून मोर्चेबांधणी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेते भाई जगताप (Congress Leader Bhai Jagtap) यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. राज्यसभेत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीने पुन्हा दगाफटका होऊ नये म्हणून आतापासून कंबर कसली असून अपक्षांमध्ये जास्त मते असणारे  बहुजन विकास आघाडीची मनधरणी करण्यासाठी भाई जगताप यांनी भेट घेतली. यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी ते मत देण्यासाठी विनंती करण्यासाठी आले असल्याचे सांगितले. काँग्रेसकडून शेवटचे उमेदवार भाई जगताप असल्याने त्यांच्यावरच मोठं संकट असल्याचे दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात