देहू, 14 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या उपस्थितीत देहूच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रम पार पडला. पण, यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना भाषणच करू न दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिलं पण राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. देहूमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण सोहळा आज पार पडला. (pm narendra modi inauguration of sant tukaram temple) लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर उपस्थितीत असलेल्या नेत्यांपैकी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे या तिघांची भाषणे झाली. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव भाषणासाठी न पुकारल्यामुळे आता कार्यक्रमाच्या संयोजक समितीवर टीका होते आहे. सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली. ‘ही खूप दुर्दैवी आहे. हा महाराष्ट्राचा आणि पुण्याचा अपमान आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते आहे. पण ते आधी राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. महाराष्ट्र सरकारने विनंती पाठवली होती. पण ती केंद्र सरकारने नाकारली होती. देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्यात आली आहे. शेवटी देवेंद्र फडणवीस यांना संधी द्यायची की नाही हा पंतप्रधान कार्यालयाचा प्रश्न आहे. जर विरोधी पक्षनेत्यांना संधी दिली जात असेल तर अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. त्यांना संधी देत नाही, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, हे खूप दुर्दैवी आहे. इतक्या कोत्या मनाचे असतील हे पहिल्यांदाच राजकारणात होत आहे, अशी टीका रा सुप्रिया सुळे यांनी केली. ( मुंबईचा संकटमोचक, क्वार्टर फायनलनंतर सेमी फायनलमध्येही शतक, टीमला सावरलं ) ‘आम्हाला संत परंपरेचा, वारकऱ्यांचा सार्थ अभिमान आहे. मी स्वत: वारी चालत असते. वारीमध्ये कुणीही मोठं नसतं आणि कुणीही लहान नसतं. माऊली म्हणून पांडुरंगाची आठवण करून लाखो वारकरी वारीत येत असतात. पंतप्रधान जेव्हा म्हणता प्रेमाचा संदेश घेऊन आलोय. त्यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाणीपूर्वक बोलू दिलं जात नाही, हे खूप दुर्दैवी आहे, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.