मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : विधान परिषदेच्या तोंडावर अनिल परबांना ईडीची नोटीस, चौकशीला बोलावले!

BREAKING : विधान परिषदेच्या तोंडावर अनिल परबांना ईडीची नोटीस, चौकशीला बोलावले!

 ईडीने याआधी परब यांची चौकशी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अनिल परब यांना समन्स बजावण्यात आला आहे

ईडीने याआधी परब यांची चौकशी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अनिल परब यांना समन्स बजावण्यात आला आहे

ईडीने याआधी परब यांची चौकशी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अनिल परब यांना समन्स बजावण्यात आला आहे

मुंबई, 14 जून : विधान परिषद निवडणूक (vidhan parishad election maharashtra 2022) तोंडावर आली असताना आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या मागे ईडीची (ed) पिडा लागली आहे. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab)  यांना ईडीने समन्स बजावला आहे. ईडीने अनिल परब यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे.

मनी लॉड्रिंग प्रकरणी अनिल परब ईडीच्या रडारवर आले आहे. ईडीने याआधी परब यांची चौकशी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा  अनिल परब यांना समन्स बजावण्यात आला आहे. परब यांना पुन्हा एकदा चौकशीला बोलावण्यात आले आहे.  याआधी एकदा अनिल परब ईडी कार्यालयात चौकशीला आले होते.  तर, ईडीने एकदा त्यांच्या शासकीय निवासस्थानी चौकशी केली होती.

सचिन वाझेच्या जबाबानंतर ईडीची कारवाई

मागील महिन्यात 26 मे रोजी  अनिल परब यांच्या संबंधित अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या होत्या. तसंच अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीकडून धाडसत्र हाती घेण्यात आलं होतं. त्यासोबतच वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी आणि दापोलीतही ईडीकडून छापे टाकले होते.

(IPL मध्ये धमाका करूनही कार्तिकचा T20 World Cup मध्ये पत्ता कट! समोर आलं कारण)

यामध्ये अनिल परब यांच्या घराचाही समावेश आहे. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू होती. यासोबतच अनिल परब यांच्यावर सुमारे 50 कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे. सचिन वाझे याने ईडीला माहिती दिली होती की, अनिल परब यांना त्याने एक मोठी रक्कम दिली होती. याशिवाय पोलिसांच्या बदल्यांसाठी पैसे घेतले होते. तसेच काही कंत्राटदारांकडूनही वसुलीही करण्याची जबाबदारी अनिल परब यांनी सचिन वाझेला दिली होती. त्या प्रकरणात चौकशी आता ईडी करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून धाड टाकण्यात आली.

अनिल परबांवर आरोप आणि छापेमारी

अनिल परब हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. अनिल परब यांनी दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. या रिसॉर्ट प्रकरणात किरीट सोमय्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली होती. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर केल्याचाही आरोप करण्यात येत आहे. याच अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणात परब यांच्यावर कारवाई होणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला. काही दिवसांपूर्वीच अनिल परब यांच्याशी संबंधित काही व्यक्तींवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती.

First published: