Home /News /national /

अजितदादांना बोलू न दिल्याबद्दल संजय राऊतांनी घेतला वेगळाच संशय, म्हणाले...

अजितदादांना बोलू न दिल्याबद्दल संजय राऊतांनी घेतला वेगळाच संशय, म्हणाले...

 'भाजपवाले म्हणतील की यात कसला झाला महाराष्ट्राचा अपमान ? तुम्हाला बोलू दिले म्हणून सन्मान नाही.

'भाजपवाले म्हणतील की यात कसला झाला महाराष्ट्राचा अपमान ? तुम्हाला बोलू दिले म्हणून सन्मान नाही.

'भाजपवाले म्हणतील की यात कसला झाला महाराष्ट्राचा अपमान ? तुम्हाला बोलू दिले म्हणून सन्मान नाही.

    अयोध्या, 14 जून : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) यांचे जिल्ह्यात कार्यक्रम सुरू आहे आणि त्यांना बोलू दिले नाही म्हणून पंतप्रधानांनी आश्चर्य व्यक्त केलं अशा प्रकारचे चित्र मी पाहिले. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केली आहे. तसंच, शेवटच्या मिनिटाला पंतप्रधान कार्यालयाने संस्थानला कळवलं नाही की आधीच कळवलं होतं? असा सवालही उपस्थितीत केला. देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न बोलू दिल्याचा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादीने यावर आक्षेप घेत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला आहे. अजित पवार हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तर या कार्यक्रमाला पंतप्रधान ते विशेष निमंत्रित होते. अजित पवार यांचे जिल्ह्यात कार्यक्रम सुरू आहे आणि त्यांना बोलू दिले नाही म्हणून पंतप्रधानांनी आश्चर्य व्यक्त केलं अशा प्रकारचे चित्र मी पाहिले.  विरोधी पक्ष नेते प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्याविषयी आमचा आक्षेप नाही त्यांना असे वाटते की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पक्षाचेच पंतप्रधान आहेत. ते फक्त पक्षाचे पंतप्रधान आहेत  आणि तसा त्यांचा वावर आहे.  पुण्याच्या सुपुत्राला, उपमुख्यमंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयाने बोलू न देणे ज्याप्रकारे सुप्रिया सुळे म्हणतात त्याप्रमाणे हा एक अस्वस्थ करणारा विषय आहे, अशी टीका राऊत यांनी केली. (IPL मीडिया राईट्समध्ये Viacom18 ची बाजी, स्टारला पुन्हा संधी!) 'भाजपवाले म्हणतील की यात कसला झाला महाराष्ट्राचा अपमान ? तुम्हाला बोलू दिले म्हणून सन्मान नाही. हा एक प्रकारे महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत अशा प्रकारच्या घटना वारंवार घडवल्या जात आहेत हे मी प्रकर्षाने सांगू इच्छितो, असंही राऊत म्हणाले. 'देहू संस्थांनाने याबाबत काही खुलासे केले आहेत की, पंतप्रधान कार्यालयाने अजित पवारांना बोलू दिले नाही. तर त्या संदर्भात संस्थानने महाराष्ट्र सरकारला कळवायला हवं होतं. शेवटच्या मिनिटाला पंतप्रधान कार्यालयाने संस्थानला कळवलं नाही की आधीच कळवलं होतं? असा सवालही राऊत यांनी केला. (गळ्यात तुळशीमाळ, हातात चिपळ्या अन्.. पंतप्रधान मोदीही विठ्ठलभक्तीत न्हाऊन निघाले) 'ज्या सुरक्षा यंत्रणाने आदित्य ठाकरे यांना थांबवलं त्या सुरक्षा यंत्रणा आज चीनच्या बॉर्डरला पाठवायला पाहिजे. आदित्य ठाकरे या राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर अशा प्रकारचे व्यक्तींकडून स्वागत केले जाते. मुंबईत येऊन तुम्हाला जर ठाकरे माहित नसतील तर हे अवघड आहे हे जाणून बुजून केला जात आहे, असा टीकाही राऊत यांनी केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या