नवी दिल्ली, 14 जून : नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald case) काँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांची सलग दोन दिवस ईडीने (ed) चौकशी केली. आज दुसऱ्या दिवशी तब्बल 10 दहा तास चौकशी केल्यानंतर सुटका केली आहे. उद्या बुधवारी पुन्हा एकदा चौकशीला बोलावण्याची शक्यता असून प्रियांका गांधी यांनाही बोलावण्याची चिन्ह आहे.
नॅशनल हेराल्डमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आज पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशीही राहुल गांधी यांची चौकशी झाली. सकाळीच राहुल गांधी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यानंतर त्यांची रात्री 11 वाजेपर्यंत ईडी चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. आज दुसऱ्या दिवशीही ठिकठिकाणी राहुल गांधींच्या ईडी चौकशीचा निषेध करत काँग्रेसने निदर्शनं केली. दरम्यान, आता प्रियांका गांधी यांनाही चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे.
काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?
1938 मध्ये काँग्रेसने असोसिएट जर्नल्स लिमिटेडची (AJL)स्थापना केली. असोसिएट जर्नल्स लिमिटेड अंतर्गत नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आहे. AJL वर 90 कोटींहून अधिक कर्ज घेतले. 90 कोटी कर्ज फेडण्यासाठी यंग इंडिया लिमिटेड कंपनीची स्थापना केली. यंग इंडिया लिमिटेडमध्ये राहुल, सोनियांची हिस्सेदारी 38-38% टक्के आहे. एजेएलचे 9 कोटी शेअर्स यंग इंडियाला दिले. शेअर्सच्या बदल्यात यंग इंडिया एजेएलचं कर्ज फेडणार आहे. देशातील मोक्याच्या जागांवर कमी किमतीत ऑफिससाठी जागा आहे.
मुंबई, दिल्ली शहरातील मोक्याच्या जागांचं भाडं AJLला मिळत होतं. या जागांचे मूल्य 2 हजार कोटींच्या घरात असल्याची माहिती समोर आली. 50 लाखांच्या मोबदल्यात यंग इंडिया कंपनी 2 हजार कोटींची मालक झाले. याबद्दल सोनिया गांधी, राहुल गांधींविरोधात सुब्रह्मण्यम स्वामींचा खटला दाखल केला. गांधी कुटुंबाकडून नॅशनल हेराल्डच्या संपत्तीच्या गैरवापराचा आरोप केला गेला. मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबेस सॅम पित्रोदाही आरोपी आहे. 26 जून 2014 रोजी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटकडून समन्स जारी केला. त्यानंतर 1 ऑगस्ट 2014 रोजी ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. 19 डिसेंबर 2015 रोजी दिल्ली पटियाला कोर्टाकडून सर्व आरोपींना जामीन मिळाला. फेब्रुवारी 2016 मध्ये सुप्रीम कोर्टाने आरोपींविरोधातील कारवाई रद्द करण्याची याचिका फेटाळली. मे 2019 मध्ये, ईडीने 64 कोटींची मालमत्ता जप्त केली. 1 जून 2022 चौकशीसाठी ईडीने सोनिया, राहुल गांधींना समन्स बजावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.