प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 26 जानेवारी : गेल्या पंधरा डिसेंबरला राजधानी दिल्लीतील शाहीन बाग परिसरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू होऊन जवळपास पंचेचाळीस दिवसाचा कालावधी झाला आहे. आगामी अजून किती दिवस हे आंदोलन सुरू राहणार यासंदर्भात अजूनही स्पष्टता नाही. जोपर्यंत नागरिकत्व सुधारणा कायदा परत घेतल्या जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा चंग शाहीन बाग आंदोलनकर्त्यांनी बांधला आहे. या आंदोलनामध्ये महिला बालक आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. महिला या समाजातील पहिल्या घटक आहे, हे समजुन या आंदोलनात जे धरणे प्रदर्शन सुरू आहे. त्या धरणे प्रदर्शनात सर्वात प्रथम महिला बसलेल्या आहेत. या महिलांमध्ये मुली तरुणी आणि वयोवृद्ध महिला सहभागी झालेल्या आहेत. यांच्यासाठी येथे हे मंडप टाकण्यात आलेला आहे. या मंडपाच्या आत थंडीची पर्वा न करता या महिला आंदोलन करत आहे.
राजधानी दिल्लीतील थंडी ही प्रचंड बोचरी असते या बोचरी थंडीची तमा या महिलांनी बाळगली नाही आणि जवळपास 24 तास त्या आंदोलनात सहभागी असतात, काही महिला आजारी आहेत तरीपण बाजूला सहभागी आहे. काही महिलांची बालके शाळेत जातात त्यांना शाळेत पाठवल्यानंतर या महिला प्रदर्शनात सहभागी होतात अशा तऱ्हेने हे प्रदर्शन सुरू आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून संपूर्ण देशभरात रणकंदन माजले आहे. याची सुरुवात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठांमध्ये ज्या पद्धतीने पोलीस अत्याचार झाले त्याचा निषेध म्हणून शाहीन बाग मध्ये प्रथम आंदोलनाला सुरुवात झाली.
त्यानंतर या आंदोलनामध्ये विविध समाजातील लोक देखील सहभागी व्हायला सुरुवात झाली पण मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये मुस्लिम महिलांचा समावेश आहे. शाहीन बाग आंदोलनामुळे संपूर्ण दिल्लीतील वाहतूक ठप्प झालेली आहे. त्यामुळे आम्हाला या भागात पोहोचण्यासाठी जवळपास दोन किलोमीटरची पायपीट करून जावे लागले. मध्य दिल्लीतून या भागात यायचं असेल तर साधारण दोन तासाचा प्रवास हा करावाच लागतो. शाहीन बाग परिसर तसा हा प्रसिद्ध मार्केटचा परिसर आहे. हा भाग दक्षिण दिल्लीला. फरीदाबाद गुडगाव यासारख्या भागाला उत्तर प्रदेशातील नोएडा शहराला जोडतो. हेच संपूर्ण शहर राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात येतात, त्यामुळे या रस्त्याला मोठं महत्त्व आहे. पण जेव्हापासून हे आंदोलन सुरू झाले तेव्हापासून संपूर्ण दिल्ली वाहतुकीमध्ये ठप्प असल्याचे पहायला मिळत आहे.
'देशात 1985 साली लागू झालं संविधान', महिला मंत्र्यांनी उधळली मुक्ताफळे
हा भाग मुस्लिम बहुल आहे. सोबतच औद्योगिक क्षेत्र देखील या भागात आहे त्यामुळे शाहीन बागला मोठं महत्त्व आहे मात्र नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू झाल्यानंतर संपूर्ण जगाला शाहीन बाग कळालेली आहे. या भागात देशी-परदेशी पत्रकार मोठ्या संख्येनं वार्तांकन करण्याकरिता येत आहेत. जेव्हा आम्ही या भागाचं वार्तांकन करण्याकरता पोचलो तेव्हा पाहिलं ही महिला या प्रदर्शनामध्ये सर्वात अग्रेसर आहे महिला मंचावरून भाषण देत आहे. वर्तमान केंद्रातील तील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील सरकारच्या विरोधात आवाज बुलंद करत आहे प्रखरपणे विरोध करीत नागरिकत्व सुधारणा कायदा परत घ्यावे अशी मागणी करीत आहेत.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधामध्ये हे जे प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनात सहभागी असलेल्या महिलांना वाटतं की त्यांच्यावर अन्याय होत आहे. आम्ही देखील या भारताचे नागरिक आहोत त्यामुळे आमच्यावर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही, त्यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत. आम्ही भारताचे नागरिक नागरिकत्व सुधारणा कायदा राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) ला नाकारतो असे त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे. येथे भारताच्या नकाशावर अशाप्रकारचे घोषवाक्य देखील लिहिलेले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध सुरू झाल्यानंतर शाहिन बाग आंदोलनात सहभागी असलेल्या प्रदर्शन कर्त्यांसाठी सामाजिक संघटनांच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आले आहे. या प्रदर्शनात असलेल्या लहान बालकांसाठी येथे एक ग्रंथालय उभारण्यात आलेले आहे. फातिमा बीबी व सावित्रीबाई फुले असे ग्रंथालयला नाव देण्यात आले आहे. येथे तीन भाषेमध्ये पुस्तक आहेत. हिंदी, इंग्रजी आणि पारशी भाषेतील पुस्तक कॉमिक्स देखील येथे आहे.
प्रदर्शनात सहभागी असलेले पुरुष बालक या पुस्तकांना वाचताना देखील पहायला मिळाले. या ग्रंथालयाला परिसरातील लोक पुस्तक दान करीत असल्याचे देखील पाहायला मिळाले. या प्रदर्शनात मोठ्या संख्येने तरुण-तरुणी देखील उपस्थित आहे. शाहीन बाग आंदोलनाचं नियोजन करण्याचे काम काही तरुणी करीत आहे. या तरुणी दिवसभर प्रदर्शनात काय चालेल याची देखील नियोजन करत असते .शांतपूर्ण पद्धतीने प्रदर्शन व्हावे आणि कुठल्याही प्रकारची हिंसा येथे उद्भवू नये याची काळजी या नियोजन करणाऱ्या तरुणी घेत आहे.
शाहीन बाग आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता देशभरातून लोक या परीसरात पोहोचत आहे विविध राज्यातील लोक देखील या आंदोलनात सहभागी होण्याकरिता येथे येत आहे. महाराष्ट्रातून देखील नागपूर-मुंबई परिसरातून विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलना करिता शाहीन बाग येथे आलेले आहे. केंद्रातील सरकार मुळे या प्रकारचे प्रश्न उद्भवत आहे असे या प्रतिनिधींना वाचते सरकार मूळ मुद्दा कडे दुर्लक्ष करून या प्रकारचे वाद ओढवून घेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.