Home /News /national /

कोरोना व्हायरसचा भारतात धोका वाढला, संशयितांची संख्या 100वर; PMO कडून अलर्ट

कोरोना व्हायरसचा भारतात धोका वाढला, संशयितांची संख्या 100वर; PMO कडून अलर्ट

चीनमध्ये या व्हायरसमुळे आतापर्यंत 41 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 800 रुग्ण संक्रमित आहेत.

    नवी दिल्ली, 26 जानेवारी : महाराष्ट्र व केरळमध्ये 100 हून अधिक कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण आढळले असून राज्य सरकारकडून वैद्यकीय तपासणीकडे अधिक लक्ष दिलं जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाने (PMO) चीनमधील घातक करोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांमुळे चिंता व्यक्त केली आहे. शनिवारी पंतप्रधान कार्यालयाने कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी सुरू असलेल्या वैद्यकीय तयारीची पाहणी केली. अद्याप कोरोना व्हायरसचा रुग्ण भारतात आढळून आला नसला तरी काही दिवसांपूर्वी चीनमधून आलेल्या सात लोकांचे नमूने पुण्यातील ICMR-NIV प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यापूर्वीही अन्य चार प्रवाशांचे नमून्यांच्या परीक्षणात व्हायरस आढळून आला नाही. देशात या आजारासंदर्भात 24X7 कॉल सेंटर सुरू करण्यात आला आहे. चीनमध्ये व्हायरसमुळे आतापर्यंत 41 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 800 रुग्ण संक्रमित आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील दोन्ही संशयित रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital)दाखल करण्यात आले होते. चीनमधील (China) करोना विषाणूमुळे आतापर्यंत 41 लोकांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये कोरोना विषाणूच्या तीन घटनांची पुष्टी झाली आहे. फ्रेंच आरोग्यमंत्री एग्नेस बुजिन यांनी सांगितले की, पहिले प्रकरण दक्षिण-पश्चिम शहरात आढळले आणि दुसरे प्रकरण पॅरिसमध्ये आढळले. त्याच वेळी, तिसरा व्यक्ती बळी पडलेला नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. असे म्हणतात की, हे तिन्ही रुग्ण चीनमधून परतले आहेत. तिन्ही रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. काय आहेत लक्षणं कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ताप, कफ, श्वास घेण्यास त्रास होणे तत्सम लक्षण दिसून येत आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. मात्र नेहमीपेक्षा काही वेगळी वा तीव्र लक्षणे दिसून येत असल्यास तातड़ीने आपल्या जवळील सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधा. चीनच्या अनेक शहरांमध्ये जाण्यास बंदी कोरोना विषाणूमुळे चीनच्या शहरांवरील हालचालींवर पूर्णपणे बंदी घातली आहे. चीनमध्ये 41 मृत्यू व्यतिरिक्त 830 लोक संक्रमित आहेत. वुहानसह 9 शहरे बंद करण्यात आली आहेत. वुहानमध्ये 700 हून अधिक भारतीय विद्यार्थी अभ्यास करतात. त्या संदर्भात चीनने प्रशासनाशी बोलणे केले आहे. यापूर्वी अहवालानुसार, चीनमधून परत आलेल्या दोन लोकांना कोरोना विषाणूची (Corona virus) लागण होण्याची भीती होती. या दोन्ही रूग्णांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही रुग्णांमध्ये हलकी थंडी व सर्दीची लक्षणे आहेत. सध्या रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या