पाटना, 26 जानेवारी : देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. 71 व्या प्रजासत्ताक दिनी बिहार सरकारमध्ये मंत्री असलेल्या बीमा भारती यांनी भाषणामध्ये आपल्या ज्ञानाची मुक्ताफळं उधळली आहेत. देशात 1985 साली संविधान लागू झालं असं त्या भाषणात म्हणाल्या. त्यानंतर दुरुस्ती करताना पुन्हा चुकीचा उल्लेख केला. त्यावेळी देशात 1955 साली संविधान लागू झालं असं त्या म्हणाल्या. बीमा भारती रविवारी समस्तीपूर इथल्या पटेल मैदानात ध्वजारोहणासाठी उपस्थित होत्या. ध्वजारोहणानंतर केलेल्या भाषणात त्या म्हणाल्या की, प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. आपलं संविधान 1985 मध्ये लागू झालं होतं असं त्या म्हणाल्या. पुन्हा आपली चुक लक्षात येताच त्यांनी अडखळत संविधान 1955 मध्ये लागू झालं असं म्हटलं. म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असल्याचं बीमा भारती यांनी सांगितले. संविधान लागू करण्यात गांधीजींची महत्त्वाची भूमिका होती. प्रत्येकजण त्यांची आदराने आठवण काढतो. संविधान तयार करण्यात डॉ. राजेंद्र प्रसाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वाचे योगदान दिल्याचंही भारती म्हणाल्या. काश्मिरमध्ये असं काय झालं की काही तासांतच पुन्हा सरकारने केली इंटरनेटबंदी बीमा भारती या पूर्णिया जिल्ह्यातील रुपौली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. जदयुच्या तिकिटावर निव़डून आलेल्या बीमा भारतली भिट्टा गाच्या रहिवाशी आहेत. संविधान लागू करण्याबद्दल बीमा भारतींनी दिलेली माहिती चुकीची असल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. देशाच्या संविधानाला 26 नोव्हेंबर 1949 ला मंजुरी मिळाली. त्यानंतर 26 जानेवारी 1950 ला ते लागू करण्यात आलं. म्हणूनच 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो. निर्भया प्रकरण : दोषी विनयने तुरुंगात लिहिली डायरी, दिलं ‘दरिंदा’ असं शीर्षक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.