नवी दिल्ली, 06 जानेवारी: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचार प्रकरणी आणखी एक नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. JNU मध्ये झालेला हिंसाचार घडवून आणण्यात आला होता. जिथे हाणामारी झाली त्या ठिकाणी कॅमेऱ्याची सुविधा नव्हती. यासोबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रुमालानं चेहरा लपवलेल्या गुंडांनी कोडवर्डचा वापर करून हिंसाचार केला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
JNU प्रशानाने दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाच्या परिसरात 8 ऑक्टोबरपासून वसतिगृहाची फी वाढवल्याविरोधात छात्रसंघासोबत इतर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. फी वाढीचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सेमिस्ट परीक्षांवर बहिष्कार टाकला होता. डाव्या संघटनांनी दोन दिवस सर्व्हर रूमवर कब्जा केला होता. त्यांनी विद्यापीठातील रजिस्ट्रेशन प्रक्रियाही बंद पाडली होती. पुढच्या सेमिस्टरचं रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख रविवारी असल्यानं काही विद्यार्थी रजिस्ट्रेशन करण्यासाठी गेले होते. तेव्हा डाव्या संघटनांनी त्यांना रोखलं आणि हुज्जत घातली. याच दरम्यान धक्काबुक्की आणि बाचाबाची झाल्यामुळे वातावरण थोडं तापलं. ही घटना घडत असताना काही शिक्ष आणि सिव्हील ट्रेसमध्ये पोलीसही उपस्थित होते. संध्याकाळी साधारण 7 च्या सुमारास चेहऱ्याला रुमाल बांधलेल्या तरुणांनी लोखंडी रॉडच्या सहाय्यानं विद्यापीठ परिसरात घुसखोरी केली. यावेळी सिव्हिल ड्रेसमध्ये असलेल्या पोलिसांसोबतही धक्काबुक्की करण्यात आली होती. यासाठी PCR कॉल करण्यात आला होता. या घटनेदरम्यान ABVPसंघटनेचे विद्यार्थी कमी होते मात्र नंतर Whatsapp आणि सोशल मीडियाचा वापर करून बदला घेण्याची योजना आखण्यात आली त्या योजनेनुसार काही कोडवर्ड वापरण्यात आले. हल्ल्यादरम्यान नेमका कुणावर हल्ला झाला हे समजण्यासाठी याचा वापर करण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Delhi: Inside visuals from Jawaharlal Nehru University (JNU) where violence broke out yesterday evening in which more than 30 people were injured. pic.twitter.com/CHjuBtp7FU
— ANI (@ANI) January 6, 2020
हेही वाचा-JNUमध्ये विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला 26/11ची आठवण करून देणारा - उद्धव ठाकरे
राजधानी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) रविवारी रात्री उशिरा मोठा हिंसाचार झाला. या हिंसाचारावरून डाव्या संघटना आणि अभविपने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत.जेएनयूमध्ये चेहरा लपवून आलेल्या गुंडांनी रविवारी जवळपास 1 तास धुडगूस घातला. पोलिसांची कुमक येत असल्याचं कळताच गुंडांनी रात्री 8 वाजता काढता पाय घेतला. दरम्यान साबरमती वसतीगृहासह आजूबाजूच्या इमारतींमध्ये लोखंडी गजांनी तोडफोड केली. यासोबत प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना देखिल मारहाण केली. या हिंसाचारात जवळपास 30 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. दरम्यान या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे. चौकशीदरम्यान जेएनयूमध्ये हिंसा कशी झाली याबाबत माहिती समोर आली आहे. तर हिंसाचाराविरोधात दिल्लीपोलिसांनी पहिला एफआयआर दाखल केला आहे.
हेही वाचा-JNUमध्ये कसा झाला हिंसाचार? विद्यापीठ प्रशासनाने सांगितली INSIDE SORY
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, JNU, Uddhav thacakrey