काँग्रेसला सोडून शिवसेनेनं हाती घेतलं कमळ, या जिल्ह्यात दिला भाजपला पाठिंबा

काँग्रेसला सोडून शिवसेनेनं हाती घेतलं कमळ, या जिल्ह्यात दिला भाजपला पाठिंबा

भाजपनं आपली जिल्हा परिषदेवरची पकड कायम ठेवत पुन्हा सत्तेची सूत्र आपल्या हातात घेतली आहेत.

  • Share this:

नितीन कुमार, प्रतिनिधी

लातूर, 06 जानेवारी : राज्याच्या राजकारणात सत्तेच्या समीकरणाचा नवा फॉर्मुला महाविकास आघाडीच्या माध्यमातून समोर आला आणि त्यानंतर लातूरची महानगर पालिका काँग्रेसच्या ताब्यात गेली. या सत्ताबदलाचा परिणाम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही पाहायला मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, भाजपनं आपली जिल्हा परिषदेवरची पकड कायम ठेवत पुन्हा सत्तेची सूत्र आपल्या हातात घेतली आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेनंदेखील भाजपला पाठिंबा देत भाजपसोबत राहण्यातच धन्यता मानली आहे. भाजपनेसुद्धा यावेळी युवा नेतृत्वाला संधी देत राहुल केंद्रे यांची अध्यक्ष म्हणून निवड केली.

विधानसभा निवडणुकीत आलेलं अपयश आणि सत्तेसाठी राज्यात झालेली फरफट पाहता या निवडणुकीला महत्व देऊन भाजपनं दोन दिवस आधीपासूनच जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांना एका रिसॉर्टमध्ये ठेवलं होतं. राजकारण आणि भाजपच्या गटा-तटामुळं पडलेली फूट यामुळे नुकसान होऊ नये यासाठी भाजपनं हवी ती खबरदारी घेतली होती. त्यामुळे ही निवड प्रक्रिया बिनविरोधच पार पडली. सेनेचा एकमेव सदस्य सोबत आल्याने अजूनही भाजप सेनेची मैत्री कायम असल्याचं नवनियुक्त अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सांगितलं.

पाहुयात लातूर जिल्हापरिषदेत कोणत्या पक्षाचे किती आहे संख्याबळ 

भाजप - 35

शिवसेना - 01

काँग्रेस - 14

राष्ट्रवादी - 05

अपक्ष - 02

इतर बातम्या - असा आहे 'मनसे'चा नवा झेंडा, 23 जानेवारीला राज ठाकरे करणार मोठी घोषणा

लातूर जिल्हा परिषद पुन्हा भाजपच्या ताब्यात गेली आहे. लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या राहुल केंद्रे तर उपाध्यक्षपदी भारतबाई दगडू सोळुंके यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघात विजय मिळवणाऱ्या काँग्रेसच्या अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांना या जिल्हा परिषदेत काही कमाल करता आली नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे.

वर्धात भाजपचे वर्चस्व

वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपाचे वर्चस्व पाहायला मिळालं. जिल्हा परिषद अध्यक्षपदी सरीता गाखरे तर उपाध्यक्षपदी वैशाली येरावार यांची निवड झाली. त्यामुळे वर्ध्यात महाविकास आघाडीचे पानिपत झाल्याचं पाहायलं मिळालं.

अमरावतीत महाविकास आघाडीचा झेंडा

अमरावती जिल्हा परिषदेत माहाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अध्यक्षपदी बबलु देशमुख तर उपाध्यक्षपदी विठ्ठल चव्हाण यांची बिनविरोध निवड होणार आहे. कारण भाजपने निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजप उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल न केल्याने अमरावती जिल्हापरिषद अध्यक्ष उपाध्यक्ष ची निवड बिनविरोध होणार आहे.

इतर बातम्या - JNU हिंसाचारामागे भाजपचा हात होता, रोहित पवारांचा घणाघाती आरोप

First published: January 6, 2020, 5:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading