जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SL : 'वंदे मातरम्'च्या जयघोषाने दुमदुमलं स्टेडियम, भारतीय प्रेक्षकांचा अभिमान वाटावा असा VIDEO

IND vs SL : 'वंदे मातरम्'च्या जयघोषाने दुमदुमलं स्टेडियम, भारतीय प्रेक्षकांचा अभिमान वाटावा असा VIDEO

IND vs SL : 'वंदे मातरम्'च्या जयघोषाने दुमदुमलं स्टेडियम, भारतीय प्रेक्षकांचा अभिमान वाटावा असा VIDEO

भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिलाच टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला. बीसीसीआयने प्रेक्षकांचा एक व्हिडिओ शेअर करून आभार मानले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

गुवाहटी, 06 जानेवारी : भारत-श्रीलंका यांच्यात झालेला पहिलाच टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला. खेळपट्टी पाण्यामुळे ओलसर झाल्यानं पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. पहिला सामना रद्द झाल्यानतंर आता दुसरा सामना 7 जानेवारी रोजी इंदूरला होणार आहे. भारत-श्रीलंका यांच्यातील सामन्यात फक्त नाणेफेक झाली. पुढचा खेळ सुरु होण्याआधी पावसाने हजेरी लावली. पाऊस गेल्यानंतर पंचांनी मैदानाची पाहणी केली मात्र खेळपट्टी ओलसर असल्यानं सामना रद्द कऱण्यात आल्याचं जाहीर केलं. दरम्यान, प्रेक्षकांनी यावेळी वंदे मातरम् चा जयघोष केला. या आवाजाने स्टेडियम दुमदुमत होतं. भारतीय प्रेक्षकांचा अभिमान वाटावा असा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात

बीसीसीआयनं गुवाहटी येथील प्रेक्षकांचा व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी भारतीय संघाने वेस्ट इंडिजला टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत नमवले होते. त्यानंतर तीन टी-20 सामन्यांची मालिका भारत खेळत आहे. दरम्यान या मालिकेत भारताकडून रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांना या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. तर, भारताकडून गेल्या दोन-तीन महिन्यांपासून संघात नसलेला जसप्रीत बुमराह कमबॅक करणार आहे. तर, या सामन्यात अँजेलो मॅथ्यूजने 18 महिन्यांनंतर श्रीलंका संघात पुनरागमन केले आहे. लसिथ मलिंगाच्या नेतृत्वात श्रीलंकेच्या संघाकडून त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारत-श्रीलंका यांच्यातील टक्कर भारत-श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 2009पासून एकूण 16 टी-20 सामने झाले आहेत. यातील 11 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर 5 सामन्यात श्रीलंकेनं बाजी मारली आहे. मुख्य म्हणजे भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या 6 द्विपक्षीय टी20 मालिकेत श्रीलंकेला एकदाही भारताला नमवता आलेले नाही. बेन स्टोक्सची अजब कामगिरी, 142 वर्षांच्या इतिहास पहिल्यांचा घडला असा प्रकार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात