Home /News /videsh /

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शिरच्छेदासाठी 5760000000 रुपयांचे बक्षिस, सुलेमानीच्या हत्येचा घेणार बदला

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शिरच्छेदासाठी 5760000000 रुपयांचे बक्षिस, सुलेमानीच्या हत्येचा घेणार बदला

अमेरिका इराण यांच्यातील तणाव वाढला असून इराणमधील एका संस्थेनं ट्रम्प यांच्या शिरच्छेद करण्यासाठी 576 कोटींचे बक्षिस ठेवले आहे. एवढी मोठी रक्कम गोळा कऱण्यासाठी इराणमधील नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे.

  तेहरान, 06 जानेवारी : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचा टॉप कमांडर कासिम सुलेमानी ठार झाल्यानंतर आखाती देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या पाच दिवसांत  अमेरिका आणि इराणकडून हल्ले झाले आहेत. इराणने कमांडर सुलेमानी याच्या हत्येचा बदला घेऊ असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे अमेरिकेनंसुद्धा आता कोणत्याही प्रकारची आगळीक खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे. कासिम सुलेमानी याच्यावर अंत्यसंस्कारावेली इराणच्या एका संस्थेनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद कऱणाऱ्यास 80 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 576 कोटी रुपयांचे बक्षिस ठेवले आहे. जनरल सुलेमानी यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी इराणच्या या संस्थेनं प्रत्येक नागरीकाने एक डॉलर दान करावे असं आवाहन केलं आहे. ट्रम्प यांच्या शिरच्छेदासाठी बक्षिस ठेवण्यात आलेली रक्कम गोळा करण्यासाठी संस्थेनं म्हटलं की, 'जनरल सुलेमानीचा खूनी ट्रम्पचा शिरच्छेद करणाऱ्यास बक्षिस देण्यासाठी दान द्या.' मसादमध्ये सुलेमानीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार कऱण्यात आले. इराणमधील बहुतांश जनतेच्या मनात अमेरिकेबद्दल संताप आहे. इराणच्या टॉप कमांडरला ठार केल्यानंतर अमेरिकेनं आणखी एक हल्ला केला होता. त्यानंतर गेल्या दोन दिवसात इराणकडून अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला करण्यात आला. याच दरम्यान इराणने मशिदीवर लाल झेंडा फडकावून युद्धच पुकारलं आहे. दुसऱीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने काही पावलं उचलली तर त्यांची 52 ठिकाणं आमच्या निशाण्यावर असून ती उद्ध्वस्त करू असा इशारा दिला होता. जनरल सुलेमानीच्या हत्येनंतर इराणने अमेरिकेला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. जनरल कासिम सुलेमानीला गुप्त कारवायांसाठी ओळखलं जात होतं. 2006 मधील इस्रायल हिजबुल्लाह युद्धात सुलेमानीने लेबनानमध्ये नेतृत्व केलं होतं. सिरियातील संघर्षातही इराणने हस्तक्षेप केला होता. यात जनरल सुलेमानीने महत्वाची भूमिका पार पाडली होती.

  वाचा : अमेरिकेनं ठार केलेल्या मेजर सुलेमानचे भारताशी कनेक्शन तुम्हाला माहिती आहे का?

  Published by:Suraj Yadav
  First published:

  Tags: Donald Trump, Iran

  पुढील बातम्या