मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'ठाकरे आडनाव आहे म्हणून थोडीफार किंमत आहे, नाहीतर...', शिवसेना नेत्याची घणाघाती टीका

'ठाकरे आडनाव आहे म्हणून थोडीफार किंमत आहे, नाहीतर...', शिवसेना नेत्याची घणाघाती टीका

शिवसेना नेत्याने नाशिकमधील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

शिवसेना नेत्याने नाशिकमधील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

शिवसेना नेत्याने नाशिकमधील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

  • Published by:  Akshay Shitole

लक्ष्मण घाटोळ, नाशिक, 6 जानेवारी : शिवसेना नेते आणि नवनिर्वाचित मंत्री गुलबराव पाटील यांनी नाशिकमधील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. 'ठाकरे आडनाव आहे म्हणून थोडीफार किंमत आहे, नाहीतर कुठे तरी पडले असते', असा हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

नाशिकमध्ये मनपाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत गुलाबराव पाटील यांनी भाजपसह मनसेवरही जोरदार टीका केली. 'बाळासाहेबांशी गद्दारी करणाऱ्यांचा सर्वनाश झाला आहे. तुमच्या भागात तरीही मनसे पक्ष थोडाफार उरला आहे. आमच्याकडे तर हा पक्ष लोणच्याएवढ्या पण उरला नाही. ठाकरे आडनाव आहे म्हणून थोडंफार वलय आहे. नाहीतर कुठेतरी बाजूला पडले असते,' असा घणाघात राज ठाकरे यांच्यावर गुलाबराव पाटलांनी केला आहे.

राज ठाकरे करणार शिवसेनेवर कुरघोडी

राज्यात बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नवी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात राज्यात सरकार स्थापन केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याचा रंग बदलण्याची शक्यता आहे. मनसे पक्षाचा झेंडा बदलण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी झेंड्याचा रंग भगवा किंवा केशरी करणार असल्याची राजकीय चर्चा आहे. झेंड्याचा रंग बदलवण्यावर विचारविनिमय झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी मोदी नाही तर शिवसेनेनं घेतला पुढाकार, 'हा' नेता करणार प्रयत्न

सध्याच्या मनसेच्या झेंड्याचा रंग निळा, भगवा आणि हिरवा आहे, हा रंग बदलून आता संपूर्ण झेंडा भगवा करण्यात येणार आहे. आणि त्यावर राजमुद्राही असेल अशी माहिती सूत्रांनी दिलीय. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यादिवशी मनसेचं महाअधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाला नवी दिशा देण्यावर कार्यकर्त्यांना उभारी देणार आहे. याच दिवशी आता राज ठाकरे मराठी अस्मितेसोबतच हिंदुत्वाचीही मोट बांधणार आहेत. त्यासाठी झेंड्याचा रंग बदलणार असल्याची माहिती समोर येत आहे.

First published:

Tags: Raj Thackeray, Shivsena