जाहिरात
मराठी बातम्या / देश / थरारक! रिझवानाची हत्या की मृत्यू? पोलिसांनी कब्रस्थानातून खोदून काढला मृतदेह आणि...

थरारक! रिझवानाची हत्या की मृत्यू? पोलिसांनी कब्रस्थानातून खोदून काढला मृतदेह आणि...

या महिलेच्या माहेरच्यांनी केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी हे थरारक पाऊल उचललं.

या महिलेच्या माहेरच्यांनी केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी हे थरारक पाऊल उचललं.

महिलेच्या माहेरच्यांनी केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी हे थरारक पाऊल उचललं. प्रकरण नेमकं काय आहे पाहूया.

  • -MIN READ Local18 Uttar Pradesh
  • Last Updated :

शहजाद राव, प्रतिनिधी बागपत, 17 जून : उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये 5 मे रोजी मृत्यू झालेल्या एका महिलेचा मृतदेह कब्रस्थानातून बाहेर काढून पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या महिलेच्या माहेरच्यांनी केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी हे थरारक पाऊल उचललं. प्रकरण नेमकं काय आहे पाहूया. मृत महिलेचं नाव रिझवाना असं होतं. ती तिच्या सासरी नांदत होती. मात्र 5 मे रोजी तिचा मृत्यू झाला आणि तिच्या सासरच्यांनी घाई-घाईने मुस्लिम पद्धतीने तिचे अंत्यसंस्कार केले. ही बातमी रिझवानाच्या माहेरी कळेपर्यंत फार उशीर झाला होता. त्यांना तिचं अंतिम दर्शनही घेता आलं नाही. आपल्या मुलीचा असा अचानक मृत्यू झाला आणि तिचे अंत्यसंस्कारही इतक्या घाईघाईत झाले? याबाबत अनेक प्रश्न तिच्या माहेरच्यांच्या मनात उभे राहिले.

News18लोकमत
News18लोकमत

रिझवानाच्या नातेवाईकांनी तिच्या पती आणि सासरच्या मंडळींविरोधात जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली. आमच्या मुलीची हत्या करून तिला दफन केल्याचा आरोप त्यांनी लावला. याबाबत रीतसर तक्रारीनंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू करून कब्रस्थानातून रिझवानाचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. आता शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच रिझवानाची हत्या की नैसर्गिक मृत्यू, याचा उलगडा होऊ शकेल आणि पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाईल. शेतात राबणारी ज्योती होणार डॉक्टर, पहिल्याच प्रयत्नात NEET मध्ये मिळवलं मोठं यश दरम्यान, मुजफ्फरनगरच्या रिझवानाचं बागपतमध्ये बिनोली क्षेत्रात असलेल्या पिचोकरा गावातील अखलाकशी लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघंही पिचोकरामध्येच राहायचे. दोघांना तीन मुलं आहेत. आता रिझवानाच्या मृत्यूने या बालकांच्या डोक्यावरून आईचं छत्र हरपलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात