Home /News /national /

भारतानं करून दाखवलं! मोदींचा प्लॅन यशस्वी; ही घ्या आकडेवारी - अमेरिकेच्या तुलनेत देशात कोरोनाचा फैलाव आटोक्यात

भारतानं करून दाखवलं! मोदींचा प्लॅन यशस्वी; ही घ्या आकडेवारी - अमेरिकेच्या तुलनेत देशात कोरोनाचा फैलाव आटोक्यात

हा नॅशनल एक्सपर्ट ग्रुप (National Expert Group) केंद्र सरकारने तयार केला असून त्यात संबंधित सर्व विभागांचे प्रतिनिधी आहेत.

हा नॅशनल एक्सपर्ट ग्रुप (National Expert Group) केंद्र सरकारने तयार केला असून त्यात संबंधित सर्व विभागांचे प्रतिनिधी आहेत.

देशात कोरोना चाचण्यांचा वेग वाढला असली, तरी रुग्णवाढीचा वेग वाढलेला नाही. 23 राज्यांच्या 78 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. अमेरिका आणि भारत यांची आतापर्यंतची आकडेवारी पाहा...

    नवी दिल्ली, 23 एप्रिल : देशातल्या Coronavirus च्या परिस्थितीविषयी ताजी आकडेवारी आणि माहिती देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे दररोज पत्रकार परिषद घेण्यात येते. या वेळी आरोग्य सहसचिवांकडून आज दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. मोदी सरकारने वेळीच देशव्यापी लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून अमेरिका किंवा ब्रिटन, फ्रान्स, इटली, स्पेनसारख्या इतर युरोपीय देशांच्या तुलनेत भारतातली Covid-19 साथीची परिस्थिती बरीच आटोक्यात राखण्यात यश आलं आहे. देशभरात कोरोनाबाधितांची संख्या 21000 च्या पुढे गेली असली तरी गेल्या 23 राज्यांच्या 78 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. आतापर्यंत भारतात COVID-19 मुळे 681 लोकांचा मृत्यू झाला आहे. पण 4257 माणसं बरी होऊन कोरोनामुक्त झाली आहेत. ताज्या आकडेवारीनुसार देशात 21393 कोरोनाग्रस्त आहेत. चाचण्या वाढला, रुग्णवाढीचा वेग कायम केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोनावाढीचा वेग नियंत्रित आहे. वाचा - कोरोनाच्या संकटात दिलासादायक बातमी, मुंबईकरांनी करुन दाखवलं! मुख्य म्हणजे कोरोना चाचण्या वाढल्या असल्या तरी रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा दर मात्र वाढलेला नाही, ही दिलासादायक बाब आहे. चाचण्या वाढल्यावर रुग्णवाढीचा वेग वाढण्याची शक्यता होती. पण देशव्यापी लॉकडाऊनमुळे या विषाणूचा फैलाव आटोक्यात राहिला असल्याचं चिन्ह आहे. 5 लाख चाचण्यांनंतर अमेरिकेची स्थिती 23 मार्चला 14915 रुग्णांची COVID-19 ची चाचणी करण्यात आली. आता चाचण्यांचा वेग वाढला आहे. आतापर्यंत गेल्या महिन्याभरात 5 लाख लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यातून 21000 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. अमेरिकेत ज्या वेळी 5 लाख टेस्ट झाल्या, त्या वेळी त्यातले 80000 जण कोरोनापॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळेच अमेरिकेतली परिस्थिती बिघडली आणि साथीने हाहाकार माजवला. भारतातली परिस्थिती तुलनेने बरी आहे. यापुढची तयारी म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत राहणं आणि रुग्णालयापर्यंत येणाऱ्या गंभीर रुग्णांचं प्रमाण कमीत कमी ठेवणं हे लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली. अन्य बातम्या लॉकडाऊनमुळे असा बदलला भारत, NASA ने शेअर केले सॅटेलाइट PHOTO तबलिगी जमातच्या सदस्यांनी कोरोनाला हरवलं, आता असा वाचवणार दुसऱ्या रुग्णांचा जीव हॉटस्पॉट झाले कमी पण धोका कायम; राज्याचं लक्ष आता या 5 धोकादायक केंद्रांकडे
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या