मुंबई, 23 एप्रिल : देशात महाराष्ट्रात सर्वांत जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबापुरीला कोरोनाचा विळखा बसला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा रोज वाढत असताना, मुंबई महापालिकेने विभागवार कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची यादी जाहीर केली आहे. ही यादी मुंबईकरांसाठी दिलासा देणारी नक्कीच आहे. मुंबई महापालिकेने बुधवारी कोरोनाबाधित लोकं बरे होऊन आपल्या घरी जातात याबाबतची आकडेवारी नकाशासह जारी केली आहे. या नकाशात सर्वात जास्त रुग्ण असलेल्या वरळी विभागात कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या सर्वात जास्त असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. वरळी विभागातील 67 रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत. **हेही वाचा -**
मुस्लीम धर्मियांचे स्तुत्य पाऊल, रमजानमध्ये कुराणचे पठण होणार फेसबुक लाईव्ह
कोरोनाने ज्या विभागात सगळ्यात जास्त हाहाकार माजवला तोच विभाग एक आशादायी चित्र घेऊनही पुढे येत आहे. वरळी येथून येणारी आनंदाची बातमी ही सगळ्यांच्याच मेहनतीचं फळ आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. मुंबईतली बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या मुंबईकरांच्या मनावर फुंकर घालणारी असली तरीही रुग्णांचा वाढता आकडा हा सुद्धा चिंता वाढवणाराच आहे .
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी मुंबई महापालिका सज्ज नव्हती आणि आताही अनेक ठिकाणी अनेक बाबतीत मुंबई महापालिका प्रशासन टीकेचे धनी ठरत आहे. मुख्य म्हणजे, ही टीका लोकांकडून नाही तर मुंबई महापालिकेचा भाग असलेल्या व्यक्तींकडून केली जात आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी हे सहाय्यक आयुक्त यांचा वेळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये वाया घालवत आहेत. याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, असं पत्र मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. हेही वाचा -
राज ठाकरेंनी पत्रातून उद्धव ठाकरेंना दिला सल्ला, पाहा नेमकं काय म्हणाले मुंबईतल्या 24 वॉर्डवर नजर टाकली तर असं दिसून येतं की, वरळी भागात 487 रुग्ण असून त्यापैकी 67 बरे झाले आहेत .सगळ्यात कमी 20 रुग्ण दहिसर विभागात असून त्यापैकी 6 बरे झाले आहेत. कुर्ला विभागात 240 रुग्ण असून इथे केवळ 8 रुग्ण बरे झाले आहेत. या विभागात रुग्ण बरे होण्याचा दर अत्यंत कमी आहे. कोरोनाचा वाढता प्रसार आटोक्यात आणण्यात महापालिकेला यश आलेले नाही. धोरणामुळे मृत्यूचा दर 4. 80 असून कोरोनामुक्त होणार यांचा दर हा खरा टक्के आहे. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.