राज्यात हॉटस्पॉट झाले कमी पण धोका कायम; या 5 धोकादायक केंद्रांसाठी बनल 7 कलमी प्लॅन

राज्यात हॉटस्पॉट झाले कमी पण धोका कायम; या 5 धोकादायक केंद्रांसाठी बनल 7 कलमी प्लॅन

राज्यात आता कोरोनाचे 5 हॉटस्पॉट कार्यरत आहेत. तिथे लॉकडाऊन कठोर करण्याव्यतिरिक्त आणखी काही उपाययोजना करण्यात येत आहेत. असा आहे राज्याचा सात कलमी अँटीकरोना प्लॅन

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल : Coronavirus चा धोका लॉकडाऊनमुळे थोडा आटोक्यात राहिला असला तरी पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढतच आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता राज्यातले कोरोना हॉटस्पॉट कमी झाले आहे आणि कोरोनाच्या फैलावाचा वेगही मंदावला आहे. पण अद्याप 5 शहरांमध्ये धोका कायम आहे. यात अर्थातच मुंबई, पुण्याचा समावेश आहे. आता मुंबईसारख्या शहरात होम क्वारंटाइनचा पर्याय न अवलंबता संस्थात्मक क्वारंटाइन करण्याची योजना आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालयात सोय केली जात आहे.

राज्यात पंधरवड्यापूर्वी एकूण 14 कोरोना हॉटस्पॉट होते. त्याची संख्या घटून आता 5 वर आली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव आणि नागपूर या पाच ठिकाणी आता राज्य सरकार लक्ष केंद्रित करणार असल्याचं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं. मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. कमी जागेमुळे होम क्वारंटाइन शास्त्रीय पद्धतीने होत नाही, अशा वेळी दाट लोकवस्त्यांमधील नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल, असं राजेश टोपे म्हणाले.

कोरोनाच्या संकटात दिलासादायक बातमी, मुंबईकरांनी करुन दाखवलं!

जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही. मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये यांचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या 14 वरून 5 वर आणण्यात यश मिळाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी बुधवारी येथे सांगितले.

लॉकडाऊनमुळे असा बदलला भारत, NASA ने शेअर केले सॅटेलाइट PHOTO

आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे बुधवारी रात्री संवाद साधला त्यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.

१- कोरोना उपचारासाठी नवीन तंत्रज्ञान आणले जात आहे. PPE कीटची गरज भासू नये यासाठी फोटो बुथ सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी एक छोटी रुम केली जाईल ज्यात केवळ एक व्यक्ती (डॉक्टर) उभी राहू शकेल. त्यारूममधून केवळ हात बाहेर निघू शकेल ज्याला ग्लोव्हज असतील त्याद्वारे रुग्णाची स्वॅब चाचणी करता येईल, यासाठी पीपीई किटची गरज नाही. मुंबईत असे 100 फोटोबुथ बसविण्यात येणार आहे.

२-  प्लाझ्मा थेरपीनुसार मुंबईत उपचाराचा प्रयोग केला जाणार आहे. जे रुग्ण बरे झालेत त्यांचे रक्तद्राव घेऊन ते कोरोनाच्या गंभीर रुग्णांना देऊन त्यांच्यामध्ये ॲण्टीबॉडीज वाढविण्याचे काम करतील.

३-  महाराष्ट्रात दररोज सुमारे 7000 कोरोना चाचण्या केल्या जातात. चाचण्या वाढवल्या जातील.

४-    कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पूर्वी  3.1, त्यानंतर 5 आणि आता 7.1 दिवसांवर गेला आहे. हा जो सात दिवसांचा कालावधी आहे तो अजून वाढविण्याचा उद्देश आहे.

५-  राज्यात दररोज 13 टक्के लोक बरे होऊन घरी जात आहेत. हे आशादायी चित्र आहे. केवळ एक टक्के रुग्ण अत्यवस्थ आहेत. 83 टक्के लोकांना लक्षणं नाही तर 17 टक्के लोकांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत.

६-  महाराष्ट्रात सुरूवातीला कोरोनासाठी 14 हॉटस्पॉट होते. आता तेथे रुग्ण संख्या नाही त्यामुळे त्याची संख्या कमी करत 5 वर आली आहे. मुंबई महानगर परिसर, पुणे परिसर, नागपूर, नाशिक, असे हॉटस्पॉट असून मालेगाववर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

७-  राज्याचा कोरोनामुळे होणारा मृत्यूदर देखील 7 वरून सरासरी 5 वर आला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी दोन समित्या नेमल्या आहेत.

लॉकडाऊनंतर कधीपासून सुरू होणार रेल्वे? जाणून घ्या काय आहे मोदी सरकारचा प्लॅन

First published: April 23, 2020, 4:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading