Home /News /national /

तबलिगी जमातच्या सदस्यांनी कोरोनाला हरवलं, आता असा वाचवणार दुसऱ्या रुग्णांचा जीव

तबलिगी जमातच्या सदस्यांनी कोरोनाला हरवलं, आता असा वाचवणार दुसऱ्या रुग्णांचा जीव

या जमातीचं आचरण करणाऱ्यांमध्ये जगातले बरेच नामवंत चेहरे आहेत. ज्यात भारताचे माजी राष्ट्रपती झाकीर हुसैन, मौलाना तारिक जमील, पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी आणि सईद अन्वर यांचा समावेश आहे.

या जमातीचं आचरण करणाऱ्यांमध्ये जगातले बरेच नामवंत चेहरे आहेत. ज्यात भारताचे माजी राष्ट्रपती झाकीर हुसैन, मौलाना तारिक जमील, पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी आणि सईद अन्वर यांचा समावेश आहे.

गंभीर कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीचा उपचार यशस्वी झाल्यानंतर अनेक ठिकाणी या उपचाराचा अवलंब केला जात आहे

    चेन्नई, 23 एप्रिल : गेल्या महिन्यात दिल्लीत निजामुद्दीन मरकज येथे (Tabligi Jamat) धार्मिक मेळावा घेऊन कोविड -19 (Covid -19) चा संसर्ग वाढविल्याचा आरोप तबलीगी जमात यांच्यावर केला जात आहे. तबलिगी जमातसंदर्भातील महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. तामिळनाडूतील कोरोनातून बरे झालेल्या तबलिगी जमातचे सदस्य मदतीसाठी पुढे आले आहेत. प्लाझ्मा थेरेपीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी ब्लड प्लाझ्मा देण्यासाठी या सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. कोविड -19 आजारापासून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्माचा उपयोग गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी होऊ शकतो. यासंदर्भात देशात प्रयोगही करण्यात आला आहे. त्यामुळे या आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांना मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं जात आहे. तबलिगी जमातीचे प्रमुख (heads a faction of Tabligi Jamaat) 54 वर्षीय मौलाना मोहम्मद साद कांदलवी यांनी सांगितल्यानुसार, त्यांनी आपल्या भावांना प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. यांचा एक भाऊ काही दिवसांपासून क्वारंटाइन होता आणि त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. याशिवाय कोरोनाची लागण झाल्यानंतर बऱ्या झालेल्या भावानांही मोहम्मद यांनी मदतीचं आवाहन केलं आहे. पुणे मिररमध्ये यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे. माणुसकीसाठी पुढे येऊन मदत करावी, असं ते यावेळी म्हणाले. साद म्हणाले, ते आणि त्यांच्यासह अनेक जणं सध्या क्वारंटाइनमध्ये आहेत. त्यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांना लॉक़डाऊनदरम्यान धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मौलाना मोहम्मद यांनी आवाहन केल्यानंतर तामिळनाडूतील तबलिगी जमातचे सदस्य प्लाझ्मा डोनेशनसाठी पुढे आले आहेत. संबंधित - मुस्लीम धर्मियांचे स्तुत्य पाऊल, रमजानमध्ये कुराणचे पठण होणार फेसबुक लाईव्ह लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या पुणेकर तरुणांना मुस्लीम कुटुंबाने दिला आसरा PPE किट अभावी Corona योद्ध्यांचा जीव धोक्यात, सायनमधील 16 विद्यार्थ्यांना संसर्ग
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या