मुंबई, 23 एप्रिल : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात करण्यात आलेल्या लॉकाडऊनमुळे लोक घरात अडकून पडले आहेत. लॉकडाऊनमुळे भारतच नाही तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. मात्र यामुळे अनेक देशांमधील प्रदुषण मोठ्या प्रमाणावर कमी झालं आहे. हवेची गुणवत्ता सुधारली आहे. नद्या स्वच्छ झाल्या आहेत. भारतातही हिमालय खराब हवेमुळे दिसत नसे तो आता जालंधरमधूनही दिसते. हरिद्वार इथं गंगेचं पाणी शुद्ध झालं आहे. आता याबाबत नासानेही फोटो शेअर केले आहेत. नासाच्या पृथ्वी निरीक्षण करणाऱ्या टीमने भारताचे गेल्या चार वर्षांतील फोटो प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये प्रदुषणाची पातळी कशी कमी झाली हे दाखवलं आहे. लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था पूर्ण ठप्प आहे. अनेक काऱखाने बंद आहेत. यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होत आहे. त्याचसोबत पर्यावरणावरही चांगला परिणाम होत आहेत. देशात एअरोसोलचं प्रमाणही कमी झालं आहे. यावर नासाच्या टीमने अभ्यास केला आहे. नासाने हे फोटो मॉडरेट रिझोल्यूशन इमेजिंग स्पेक्ट्रोरेडिओमीटर (MODIS) टेरा सॅटेलाइटच्या सहाय्याने घेतले आहेत. लॉकडाऊनमुळे प्रदुषणाची पातळी वेगाने खाली आली आहे. भारतात तर प्रदुषण संपल्यासारखंच दिसत आहे. नासाने सॅटेलाइटच्या फोटोंमधून हे स्पष्ट केलं आहे.
फोटो पोस्ट करताना नासाने म्हटलं की, भारतात प्रदुषण घटलं आहे. 25 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलं असून जवळपास 130 कोटी लोक घरात आहे. गंगा काठ स्वच्छ झाला आहे. या नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या शहरांवर गेल्या 20 वर्षांत जे पुसटसं ढग होतं ते गेलं. एअरोसोलचे ढग या शहरांवर दिसायचे मात्रा प्रदुषण कमी झाल्यानं ते नाहीसे झाले. हे वाचा : Lockdown मधलं सुंदर पुणं आणि हटवादी पुणेकर - पाहायलाच हवेत असे PHOTO देशात लॉकडाऊनमुळे कारखाने बंद आहेत. त्याशिवाय कार, बस, ट्रक, ट्रेन, विमान सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. यानंतर नासाने भारताचे सॅटेलाइटने काढलेले फोटो पाहिले तेव्हा आश्चर्यकारक असं चित्र दिसलं. 2016 पासूनचे फोटो पाहिल्यास यातून प्रदुषण किती कमी झालं हे दिसतं. हे वाचा : कोरोनाच्या संकटात दिलासादायक बातमी, मुंबईकरांनी करुन दाखवलं! नासाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतात हवा प्रदुषणाची पातळी सर्वाधिक कमी झाली. सॅटेलाइटच्या डेटावरून समजतं की, लॉकड़ाऊननंतर हवेची गुणवत्ता वेगानं सुधारली आहे. नासाच्या मोडिस एअरोसोल प्रॉ़डक्ट्स च्या प्रोग्रॅम लीडरने म्हटलं की, भारतात स्वच्छ हवेसाठी यापेक्षा चांगला उपाय असू शकत नाही. फक्त हवाच नाही तर जमीन, पाणी सगळं स्वच्छ झालं. भारताला असे प्रयत्न करायला हवेत ज्यामुळे वातावरण चांगलं राहिल. हे वाचा : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या पुणेकर तरुणांना मुस्लीम कुटुंबाने दिला आसरा संकलन, संपादन - सूरज यादव

)







