Home /News /national /

12 वर्षांखालच्या मुलांना Corona लस घेतल्याशिवाय शाळा नको यासाठी कोर्टात याचिका

12 वर्षांखालच्या मुलांना Corona लस घेतल्याशिवाय शाळा नको यासाठी कोर्टात याचिका

योग्य आहार, नियमित व्यायाम, आणि मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं तर आजारापासून दूर राहता येतं असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.

योग्य आहार, नियमित व्यायाम, आणि मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं तर आजारापासून दूर राहता येतं असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.

शाळा सुरू होताच कोरोनाचा धोका लहान मुलांपर्यंत पोहोचेल या भीतीने कोरोनाप्रतिबंधक लस येईपर्यंत मुलांनी शाळेत जाऊ नये यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

    कोलकाता, 12 जून : Coronavirus चा धोका संपायचं नाव घेत नाही. त्यातच नवं शैक्षणिक वर्ष कधी सुरू करायचं याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. काही राज्यांनी ऑगस्टमध्ये शाळा सुरू करण्याची तयारी चालवली आहे. पण शाळा सुरू होताच कोरोनाचा धोका लहान मुलांपर्यंत पोहोचेल या भीतीने कोरोनाप्रतिबंधक लस येईपर्यंत मुलांनी शाळेत जाऊ नये यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रियांका तिब्रेवाल या वकील महिलेने 12 वर्षांखालच्या मुलांनी कोरोनाची लस येईपर्यंत शाळेत जाऊ नये यासाठी कोलकाता उच्च न्यायायालयात याचिका दाखल केली आहे. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे लस टोचल्याशिवाय त्यांना शाळेत जायची परवानगी देऊ नये असं या वकील बाईंचं म्हणणं आहे. परीक्षा न घेण्याच्या निर्णयाविरोधात पुण्यातील 4 मोठ्या शिक्षण संस्था आल्या पुढे कोलकाता हायकोर्टातल्या मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना या केसमध्ये आपापली बाजू मांडायला सांगितलं आहे. पुढच्या आठवड्यात या प्रकरणी पुढची सुनावणी होईल. राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थितीत  परीक्षा घेण्यावरून वाद पेटला आहे. शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात आता चार मोठ्या शिक्षणसंस्थांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन परीक्षा घेण्याच्या निर्णयावर आपली भूमिका मांडली आहे. पुण्यातील  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था या चारही शिक्षण संस्थेकडून संयुक्त पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. राज्य सरकारने अंतिम परीक्षा न घेण्याचा लोकप्रिय निर्णय जाहीर केला होता. पण कायदेशीर पातळीवर परीक्षा न घेण हा निर्णय टिकणे अवघड आहे. सरकारने निर्णय जाहीर केला खरा पण आता हे खेळवत बसणं अयोग्य आहे, असं मत या संस्थांनी व्यक्त केलं. अन्य बातम्या 'वडिलांनी वर्षभराच्या पगारातू मला अमेरिकेचं तिकीट काढून दिलं ' KBC त 1 कोटी जिंकल्यानंतर झाला डॉक्टर, आता आहे पोलीस अधीक्षक
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus, Lockdown

    पुढील बातम्या