VIDEO : 'वडिलांनी वर्षभराच्या पगारातून मला अमेरिकेचं तिकीट काढून दिलं '... Google च्या CEO ने विद्यार्थ्यांना दिला पेशन्सचा कानमंत्र

VIDEO : 'वडिलांनी वर्षभराच्या पगारातून मला अमेरिकेचं तिकीट काढून दिलं '... Google च्या CEO ने विद्यार्थ्यांना दिला पेशन्सचा कानमंत्र

'भारतात घरी एक फोन करण्यासाठी 2 डॉलर मिनिटाला लागायचे. इथे एक पाठीवरची सॅक घ्यायची तर वडिलांच्या महिन्याच्या पगाराएवढी किंमत होती...' सुंदर पिचाईंनी पहिल्यांदाच जगाला सांगितली स्ट्रगलची गोष्ट. पाहा VIDEO

  • Share this:

मुंबई, 8 जून : Google चे CEO मूळचे भारतीय असणारे सुंदर पिचाई Sundar Pichai यांचं Dear Class of 2020 या YouTube स्ट्रीमवरचं भाषण सध्या सोशल मीडियावर कमालीचं लोकप्रिय होत आहे.  जागतिक महासाथीच्या काळात (Coroanvirus), लॉकडाऊन (Lockdown)सुरू असताना पदवी घेऊन ग्रॅज्युएट होणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या यशाची गुरुकिल्ली देताना जगातल्या या सर्वात मोठ्या टेक्ऩॉलॉजी कंपनीचा मूळचा भारतीय असलेला सर्वोच्च अधिकारी आपल्या भारतातून अमेरिकेत आल्यानंतरच्या स्ट्रगलविषयी पहिल्यांदाच जाहीरपणे बोलला.

सुंदर पिचाई यांचं शिक्षण, संगोपन चेन्नईमध्ये झालं. IIT मधून(Indian Institute of Technology)इंजिनिअरिंग केल्यानंतर मास्टर्स डिग्री मिळवण्यासाठी ते अमेरिकेतल्या स्टॅनफर्ड विद्यापीठात (Stanford University)दाखल झाले होते. 27 वर्षांपूर्वीच्या या स्ट्रगलची आठवण विद्यार्थ्यांना सांगताना सुंदर पिचाई म्हणाले, "त्या वेळी माझ्या वडिलांनी वर्षभराचा पगार माझ्या अमेरिकेच्या विमानप्रवासासाठी दिला होता. अमेरिेत पाऊल ठेवल्यानंतर परिस्थिती कठीण असल्याची जाणीव झाली. खूप महाग वाटली होती तेव्हा अमेरिका. भारतात घरी एक फोन करण्यासाठी 2 डॉलर दर मिनिटाला खर्च करावे लागायचे. इथे एक पाठीवरची सॅक घ्यायची तर त्याची किंमत माझ्या वडिलांच्या महिन्याच्या पगाराएवढी होती."

"त्या परिस्थितीतून आज Google च्या CEO पदापर्यंत मला घेऊन आलं माझं भाग्य आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स", असं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.

YouTube ने Dear Class of 2020 या सीरिजमध्ये प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा प्रवास विद्यार्थ्यांना सांगायचा प्रयत्न केला आहे. कोरोनाव्हायरसच्या लॉकडाऊन काळात पदवीप्रदान कार्यक्रमही ऑनलाइन झाले. त्यामुळे या व्हर्च्युअल कार्यक्रमातून या वर्षी पदवी मिळवणाऱ्या जगभरातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. रविवारी यामध्ये सुंदर पिचाई यांनी आपल्या संघर्षाची गोष्ट स्वतः सांगून विद्यार्थ्यांना कठीण काळात पेशन्स किती आवश्यक आहे हे समजावून सांगितलं. डिअर क्लास ऑफ 2020 या कार्यक्रमात याआधी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, मिशेल ओबामा, लेडी गागा यांनी संदेश दिले आहेत.

हेही वाचा - शेतकऱ्याच्या मुलाने भाजी विकून केला अभ्यास तरी झाला दहावीचा टॉपर

"बाहेरच्या परिस्थितीमुळे तुम्हाला नैराश्य येईल कदाचित. पण तुम्ही तुमचा संयम सोडू नका. हार मानू नका. त्यातूनच आमच्या पिढीने स्वप्नातही विचार न केलेलं नवं तंत्रज्ञान अस्तित्वात येणार आहे", असं सुंदर पिचाई यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.

इथे पाहा त्यांचं संपूर्ण भाषण..

First published: June 8, 2020, 5:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading