KBC त 1 कोटी जिंकल्यानंतर झाला डॉक्टर, आता आहे पोलीस अधीक्षक

KBC त 1 कोटी जिंकल्यानंतर झाला डॉक्टर, आता आहे पोलीस अधीक्षक

रवी मोहन यांनी 2001 मध्ये केबीसीमध्ये सहभाग घेतला होता.

  • Share this:

पोरबंदर, 2 जून : कौन बनेगा करोडपतीमध्ये त्यानं वयाच्या 14 व्या वर्षी एक कोटी रुपये जिंकले होते. आता वयाच्या 33 व्या वर्षी पोरबंदरच्या पोलीस अधीक्षक म्हणून त्याने पदभार स्वीकारला. यशाचे शिखर गाठणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे रवि मोहन सैनी. 2001 मध्ये कौन बनेका करोडपती ज्यूनिअरमध्ये रविने 15 प्रश्नांची अचूक उत्तरं दिली होती. त्यावेळी 14 वर्षांच्या रवी मोहनने एक कोटी जिंकले होते.

राजस्थानचे असलेल्या रवी मोहन सैनी यांनी मंगळवारी पोरबंदरचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे. सध्या 33 वर्षांचे असलेले रवी सैनी हे आयपीएस आहे. त्यांचे वडील हे राजस्थानमधील अलवर इथे राहतात. ते निवृत्त नौदल अधिकारी आहेत.

हे वाचा-Success Story: चहा विकणाऱ्याचा मुलगा झाला IAS अधिकारी

रवी मोहन यांनी 2001 मध्ये केबीसीमध्ये सहभाग घेतला होता. तेव्हा ते दहावीमध्ये शिकले होते. 2017 मध्ये रवीने टाइम्स ऑफ इंडियाला एक मुलाखत दिली होती. त्यात सांगितलं होतं की, त्यांनी एक कोटी जिंकले पण त्यातले कर वगैरे कपात करून 69 लाख रुपये मिळाले होते. नियमानुसार हे पैसे जिंकणाऱ्याला त्याचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळतात.

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवी मोहन यांनी जयपूरमधील महात्मा गांधी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केलं. 2012 आणि 2013 मध्ये त्यांनी युपीएससीची परीक्षा दिली होती. शेवटी त्यांना हवी तशी रँक 2014 मध्ये मिळाली. ते गुजरात कॅडरमध्ये आयपीएस झाले.

हे वाचा-वडिलांनी घर विकून उभे केले पैसे, पहिल्याच प्रयत्नात मुलगा झाला IAS

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 2, 2020, 11:11 AM IST
Tags:

ताज्या बातम्या