नवी दिल्ली, 23 मे : Coronavirus च्या लॉकडाऊनच्या काळात दोन महिने बंद असलेली रेल्वे सेवा अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी पुन्हा सुरू झाली. 1 मेपासून या मजुरांना आपापल्या घरी पोहोचवण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. त्याचा फायदा मुख्यतः उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये घर असलेल्या स्थलांतरित कामगारांनी घेतला आहे. रेल्वे बोर्डातर्फे दिल्या गेलेल्या माहितीनुसार, रेल्वे सेवा सुरू झाल्यापासून 2600 गाड्या सोडण्यात आल्या आणि त्याचा फायदा घेत 35 लाख लोक आपापल्या घरी पोचू शकले. या 35 लाखातले 80 टक्के कामगार म्हणजे सुमारे 28 लाख लोक देशभरातून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पोहोचले आहेत, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी दिली. 1 मेपासून श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या. तेव्हापासून 2600 फेऱ्या झाल्या आणि 35 लाख कामगार गेले आपापल्या गावी पोहोचले. पुढच्या 10 दिवसांत आणखी 2600 गाड्या सोडण्यात येतील, असं रेल्वेतर्फे सांगण्यात आलं. राज्यानं मागणी केल्यास त्या त्या राज्यासाठीही रेल्वे सोडण्याचा विचार करण्यात येईल, असंही विनोदकुमार यादव यांनी सांगितलं. रेल्वेने प्रवास करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आवश्यक आहे. श्रमिक ट्रेनने प्रवास करणाऱ्या सर्वांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणं बंधनकारक आहे. रेल्वे स्टेशनवर सगळ्यांची तपासणी होईल आणि आजाराची लक्षणं दिसत नसतील त्यांनाच प्रवासाची अनुमती देण्यात येईल.
कोरोनाव्हायरसची परिस्थिती सुधारत असली, तर लवकरच इतर रेल्वे गाड्याही सुरू करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. परिस्थिती पाहून 1 जूनपासून आणखी 200 मेल एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्यात येतील, अशी माहिती रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली. गाड्यांच्या आरक्षणाची सुरुवात 21 मे पासून सुरू झालेली आहे. अन्य बातम्या भारतातील त्या सायकल गर्लचं इवांका ट्रम्पकडून कौतुक; ओमर अब्दुल्ला मात्र संतापले विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी घेता येणार, UGC चा मोठा निर्णय 1 जूनपासून सुरू होणार सुरू होणार एक्स्प्रेस ट्रेन; रेल्वेकडून महत्त्वाची माहिती

)







