विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी घेता येणार, UGC चा मोठा निर्णय

विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी घेता येणार, UGC चा मोठा निर्णय

यापूर्वी एकाच वर्षात दोन पदवी अभ्यासक्रमांची तरतूद नव्हती, तसंच परवानगीही नव्हती.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मे:  विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, विद्यार्थ्यांना एकाचवेळी दोन पदवी घेण्याची परवानगी दिली आहे. याचा अर्थ विद्यार्थी एका सत्रात दोन पदवी अभ्यासक्रम करू शकतात. परंतु, यापैकी एक अभ्यासक्रम नियमित अभ्यासक्रमाअंतर्गत असेल, तर दुसरा कोर्स मुक्त विद्यापीठातून करता येईल.

दोन्ही पदवी अभ्यासक्रम एकाच वेळी येऊ शकत नाहीत. या प्रस्तावाला आयोगाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे युजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी सांगितलं. त्यानंतर विद्यार्थी एकाच वेळी दोन  डिग्री अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. ते म्हणाले की, 'दोन पदांपैकी एक नियमित मार्गाने पूर्ण करावा लागेल आणि दुसरा ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल'.  यूजीसी लवकरच या संदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -भयंकर! पिंपरी चिंचवडच्या मुख्य रस्त्यावर तब्बल 2 तास पडून होता वृद्धाचा मृतदेह

यापूर्वी एकाच वर्षात दोन पदवी अभ्यासक्रमांची तरतूद नव्हती, तसंच परवानगीही नव्हती. पण आता विद्यार्थी हे करू शकतात. युजीसीच्या या सुटीचा सर्वात खास गोष्ट म्हणजे विद्यार्थी दोन भिन्न प्रवाहाचे कोर्स देखील घेऊ शकतात. उदाहरणार्थ, विज्ञान विषय असलेला विद्यार्थी कला क्षेत्राचा दुसरा कोर्स करू शकतो. यामध्ये ज्या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी पूर्णवेळ अभ्यासक्रम करीत असेल त्याला त्या संस्थेत परवानगी द्यावी अशी अट ठेवण्यात आली  आहे.

युजीसीने याबाबत सांगितले की, 'किमान उपस्थितीचा मुद्दा नियमित अभ्यासक्रमांशी निगडीत असल्याने दूरस्थ शिक्षणाबरोबर दुसरा अभ्यासक्रम करण्याचा समितीकडे पर्याय आहे. युजीसीचा असा विश्वास आहे की, यामुळे विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगले करिअर होण्याची शक्यता वाढेल. याप्रकारचा आयोग पहिल्यांदा विचार करीत आहे.'

हेही वाचा -अजित पवारांचा हटके अंदाज, बारामतीकरही झाले अवाक्

यापूर्वीही, युजीसीने एक समिती गठीत केली होती आणि या विषयावर सर्वांचे मत घेतले होते. पण यावर चर्चा होऊ शकली नाही. पण यावेळी हा प्रश्न उद्भवला तेव्हा विद्यार्थ्यांना दोन डिग्री करण्याची मान्यता मिळाली. सोबतच हे देखील महत्वाचे आहे की, विद्यार्थी एका वेळी फक्त दोन अभ्यासक्रम घेऊ शकतात. विद्यार्थ्यांना दोनपेक्षा जास्त अभ्यासक्रम करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2020 05:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading