1 जूनपासून सुरू होणार सुरू होऊ शकतात एक्स्प्रेस ट्रेन; रेल्वेकडून आली महत्त्वाची माहिती

1 जूनपासून सुरू होणार सुरू होऊ शकतात एक्स्प्रेस ट्रेन; रेल्वेकडून आली महत्त्वाची माहिती

1 मेपासून श्रमिक स्पेशल ट्रेनमुळे 35 लाख कामगार गावी पोहोचले आहेत. त्यातले 80 टक्के बिहार आणि UP ला रवाना झाल्याची माहिती रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली. 1 जूनपासून आणखी काही मेल आणि एक्स्प्रेस सुरू होऊ शकतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मे : रेल्वे सेवा सुरू झाल्यापासून 2600 गाड्या सोडण्यात आल्या आणि त्याचा फायदा घेत 35 लाख लोक आपापल्या घरी पोचू शकले, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी दिली. या 35 लाखातले 80 टक्के कामगार म्हणजे सुमारे 28 लाख लोक देशभरातून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पोहोचले आहेत.

1 मेपासून श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या. तेव्हापासून 2600 फेऱ्या झाल्या आणि 35 लाख कामगार गेले आपापल्या गावी पोहोचले. पुढच्या 10 दिवसांत आणखी 2600 गाड्या सोडण्यात येतील, असं रेल्वेतर्फे सांगण्यात आलं. राज्यानं मागणी केल्यास त्या त्या राज्यासाठीही रेल्वे सोडण्याचा विचार करण्यात येईल, असंही विनोदकुमार यादव यांनी सांगितलं.

रेल्वेने प्रवास करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आवश्यक आहे. श्रमिक ट्रेनने प्रवास करणाऱ्या सर्वांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणं बंधनकारक आहे. रेल्वे स्टेशनवर सगळ्यांची तपासणी होईल आणि आजाराची लक्षणं दिसत नसतील त्यांनाच प्रवासाची अनुमती देण्यात येईल.

कोरोनाव्हायरसची परिस्थिती सुधारत असली, तर लवकरच इतर रेल्वे गाड्याही सुरू करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. परिस्थिती पाहून 1 जूनपासून आणखी 200 मेल एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्यात येतील, अशी माहिती रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली. गाड्यांच्या आरक्षणाची सुरुवात 21 मे पासून सुरू झालेली आहे.

अन्य बातम्या

'या' रेल्वेसाठी तिकीट बुक करण्याच्या नियमांत बदल,30 दिवस आधी करावं लागणार आरक्षण

लॉकडाऊनमध्ये फुललं प्रेम; अन्नदान करताना भिकारी मुलीच्या प्रेमात पडला आणि...

मजुरांचे हाल थांबेनात! मुंबईहून निघालेली एक्स्प्रेस गोरखपूरऐवजी पोहोचली ओडिशात

First published: May 23, 2020, 5:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading