Home /News /national /

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतात 36 तास मुक्काम, मोदींसोबत लंच तर या मुद्द्यांवर होणार चर्चा

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतात 36 तास मुक्काम, मोदींसोबत लंच तर या मुद्द्यांवर होणार चर्चा

24 फेब्रुवारीला अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प अहमदाबादेत पोहोचतील. रोड शो केल्यानंतर ते मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) पोहोचतील.

    नवी दिल्ली,19 फेब्रुवारी:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald trump India visit) येत्या 24 फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पहिला भारत दौरा आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) सूत्रांनुसार, डोनाल्ड ट्रम्प 36 तास भारतात थांबणार आहेत. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रंगला (Harsh Vardhan Shringla) यांच्या मते ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकेचे शिष्टमंडळही असणार आहे. त्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असेल. परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, 24 फेब्रुवारीला अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प अहमदाबादेत पोहोचतील. रोड शो केल्यानंतर ते मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) पोहोचतील. येथे आयोजित एका कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) संबोधित करतील. 'हाउडी मोदी'च्या धर्तीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हेही वाचा.. राधाकृष्ण विखे पाटील नव्या रस्त्याच्या शोधात...? संपर्क कार्यालयावरुन झेंडा गायब या मुद्द्यांवर होणार चर्चा अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या दोन्ही राष्ट्राच्या बाबतीत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. संरक्षण, दहशतवाद, विद्युत आदी मुद्द्यांचा चर्चेत समावेश असेल. या दरम्यान पीएम मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सोबतच लंच घेतील. 8 महिन्यात उभय नेत्यांची पाचवी भेट डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात मागील 8 महिन्यांतील ही पाचवी भेट असणार आहे. खुद्द ट्रम्प यांनी सांगितले होते की,नरेंद्र मोदी हे त्यांचे चांगले मित्र आहे. मात्र, ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारताला मोठा झटका दिला होता. भारतासोबत ट्रेड डील करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. अमेरिका लवकरच भारताशी ट्रेड डील करेल, अशी अपेक्षा मोदी सरकारला आहे. हेही वाचा... शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन येणार, उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय अलिशान ऑफिस, 100 जणांच किचन, सर्जरी रुम.. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या महिन्याच्या शेवटी भारत दौऱ्यावर येणार आहे. अध्यक्ष झाल्यानंतरचा ट्रम्प यांचा हा पहिलाच दौरा आहे. यात ते अहमदबादलाही भेट देणार असून पंतप्रधान मोदींसोबत जाहीर भाषणही करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जेव्हा विदेश दौऱ्यांवर असतात तेव्हा ते एका खास विमानाने प्रवास करतात. Air Force One असं त्या विमानाचं नाव असून ते जगातलं सर्वात शक्तिशाली विमान असल्याचं समजलं जातं. अत्याधुनिक संपर्क यंत्रणा आणि तेवढ्याच तोडीची सुरक्षा व्यवस्था असलेलं हे विमान कायम जगभर कुतुहलाचा विषय ठरलं आहे. बोईंग 747-200बी श्रेणीचं हे विमान असून त्यावर United States Of Amecrica असं लिहिलेलं आहे. जगात कुठल्याही हवामानात उतरण्याची या विमानाची क्षमता आहे. त्याचबरोबर हवेतल्या हवेत इंधन भरण्याचीही त्याची क्षमता आहे. कुठल्याही क्षेपणास्त्राला परतवून लावण्याची व्यवस्था असून संभाव्य धोक्याची कल्पना देण्याची अत्यंत आधुनिक रडार यंत्रणाही त्यावर बसविण्यात आलीय. हेही वाचा. गाईने लहान मुलाला तुडवलं, पूर्ण व्हिडिओ पाहण्याचं धाडसं होणार नाही विमानात तब्बल 4 हजार स्क्वेअरफुट जागा वापरासाठी उपलब्ध आहे. त्यात अध्यक्षांसाठी अलिशान ऑफिस, काही खोल्या आहेत. त्याचबरोबर पाहुण्यांसाठीही बसण्याची खास व्यवस्था आहे. आणीबाणीच्या काळात याच ऑफिसचा उपयोग वॉर रुम म्हणून करण्याचीही सोय आहे. विमानात खास सर्जरी रुम असून त्यात कायम दोन डॉक्टर्स तैनात असतात. त्याचबरोबर विमानात दोन किचन्स असून त्यात प्रत्येकी 100 जणांचा स्वयंपाक तयार करता येतो. या विमानात किमान 400 जण एकाच वेळी प्रवास करू शकतात.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: American president donald trump, BJP narendra modi, Narendra modi, PM narendra modi

    पुढील बातम्या