गाईने लहान मुलाला तुडवलं, पूर्ण व्हिडिओ पाहण्याचं धाडसं होणार नाही

गाईने लहान मुलाला तुडवलं, पूर्ण व्हिडिओ पाहण्याचं धाडसं होणार नाही

गावात मोकाट फिरणाऱ्या एका गाईने लहान मुलावर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पिसाळलेल्या गाईने मुलाला अक्षरश तुडवलं आहे.

  • Share this:

चंदीगढ, 19 फेब्रुवारी : प्राण्यांकडून माणसांवर हल्ले होण्याचे प्रकार अधूनमधून समोर येत असतात. जंगली प्राणी मानवी वस्तीत आल्यानंतर त्यांच्याकडून हल्ला होण्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. आता गावात मोकाट फिरणाऱ्या एका गाईने लहान मुलावर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पिसाळलेल्या गाईने मुलाला अक्षरश तुडवलं आहे. यावेळी गावकऱ्यांनी गाईला दगड मारून, काठीने हुसकावण्याचा प्रयत्न केला मात्र मुलाची सुटका होऊ शकली नाही.

पंजाबच्या मुक्तसर इथला हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. थांदेवाला रोडवर एका सीसीटीव्हीत गाय मुलाला मारत असल्याचं कैद झालं आहे. या व्हिडिओमध्ये गाय मुलाला पायाने तुडवत असताना दिसत आहे. मुलाला वाचवण्यासाठी गावचे लोक आजुबाजुला दिसतात. गाईला पळवून लावण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. पण गाय मुलाला शिंगानेसुद्धा मारहाण करत राहते. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

गाई हल्ला करत असताना लोक तिला पळवून लावण्यात अखेर यशस्वी ठरतात. लोकांनी काठी आणि दगड मारल्यानंतर गाय पळून जाते. त्यानंतर मुलगा उठून उभा राहिल्याचं दिसत आहे. मुलगा थोडा चालल्याचं जरी व्हिडिओत दिसलं असलं तरी त्याला यात दुखापत किती झाली आणि पुढे काय झाले याची माहिती मिळू शकली नाही. मात्र गाय ज्या पद्धतीने त्याच्यावर हल्ला करत होती ते दृश्य खूपच वाईट आहे.

वाचा : हॉटेलच्या किचनमध्येच कर्मचारी करत होता आंघोळ, VIDEO VIRAL झाला आणि...

वाचा : धाडसीपणा नव्हे हा मूर्खपणा; ‘त्या’ व्हिडिओवर रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला संताप

First published: February 19, 2020, 5:50 PM IST
Tags: Punjab

ताज्या बातम्या