राधाकृष्ण विखे पाटील नव्या रस्त्याच्या शोधात...? संपर्क कार्यालयावरुन झेंडा गायब

राधाकृष्ण विखे पाटील नव्या रस्त्याच्या शोधात...? संपर्क कार्यालयावरुन झेंडा गायब

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर भाजपचा झेंडा नसल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

  • Share this:

शिर्डी,19 फेब्रुवारी: भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर भाजपचा झेंडा नसल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. श्रीरामपूर येथे काल, मंगळवारी विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झालं. मात्र, कार्यक्रमात कुठेही भाजपचा झेंडा दिसला नाही. एवढेच नाही तर कार्यालयावरूनही भाजपचा झेंडा गायब होता.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. विखे पाटल यांनी स्वत: कार्यालयाचे उद्घाटन केलं. काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपच्या गोटात सामील झाले होते. भाजपच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी मिळवली होती. मात्र, राज्यात भाजपाची सत्ता न आल्याने कदाचित त्यांचा हिरमोड झाला आहे. श्रीरामपूर येथे विखे पाटलांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. मात्र भाजपाचा झेंडा कुठेही दिसला नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

हेही वाचा.. उंच किल्ल्यावरून पडून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू, शिवजयंतीसाठी गेली होती मित्रांसोबत

स्थानिक राजकारण मोठी उलथापालथ

श्रीरामपूर येथील स्थानिक राजकारण बघितलं तर मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र आहे. विखे समर्थक असलेले ससाणे थोरातांच्या जवळ गेले आहेत. तर काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत दाखल झाले आहेत. नगरपालिका, बाजार समिती, पंचायत समितीसह अनेक गावात विखे पाटील समर्थक पदाधिकारी आहेत. मात्र, विखे पाटलांच्या पक्षबदलानंतर कार्यकर्ते अजूनही काँग्रेस किंवा इतर पक्षात आहेत. कदाचित त्यामुळेच श्रीरामपूर येथील संपर्क कार्यालयाला 'राधाकृष्ण विखे पाटील संपर्क कार्यालय' असं टायटल देण्यात आलं आहे. ज्यामुळे कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना तिथे येण्यास अडचण होणार नाही. मात्र, हेच कारण आहे की अन्य काही..? त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील खरंच भाजपपासून दूर चालले आहेत का, असा सवाल निर्माण झाला आहे.

हेही वाचा.. अजित दादा, आपण उगाच वेगळे राहिलो, आधीच एकत्र यायला हवं होतं-उद्धव ठाकरे

बॅनरवरून तर्कवितर्क..

दरम्यान, श्रीरामपूर येथील कार्यालयात लावलेल्या एका बॅनरवरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. विखे पाटील नेमकं कोणत्या नव्या रस्त्याच्या शोधात आहे, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

First published: February 19, 2020, 4:56 PM IST

ताज्या बातम्या