नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : सध्या जगभरात कोरोनाचं संकट आहे. अशात आता आणखी एका संकटाचा इशारा देण्यात आला आहे. हे संकट म्हणजे मुंबईसह 12 शहरं पाण्यात बुडणार आहे. अमेरिकी अंतराळ संस्था नासा (NASA) आणि इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजने (IPCC) हा धक्कादायक रिपोर्ट जारी केला आहे.
वैज्ञानिक वारंवार आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजेच जागतिक तापमानवाढीविषयी (Global Warming) माहिती देत असतात. काही दिवसांपूर्वीच याबाबत आणखी एक अहवाल जारी झाला आहे. ज्यात इसवी सन 2100 पर्यंत म्हणजे अवघ्या 79 वर्षांमध्ये जगाच्या तापमानामध्ये 4.4 डिग्री (World temperature in 2100) सेल्सिअसने वाढ होईल. यामुळे दक्षिण आणि उत्तर ध्रुवांवरील बर्फ वितळून जगातील अनेक ठिकाणची जमीन पाण्याखाली जाईल. यामध्ये भारतातील समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या 12 शहरांचा समावेश आहे. ही शहरं सुमारे 3 फूट पाण्याखाली जातील असं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
नासाने एक सी लेव्हल प्रोजेक्शन टूल (Sea level projection tool) बनवलं आहे. या टूलमध्ये जगाचा नकाशा (world in sea level projection tool) दिला आहे, ज्यात दाखवलं आहे की कोणत्या वर्षी जगातील कोणत्या भागातील समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल.
As communities across the world prepare for the impacts of sea level rise, a new visualization tool provided by @NASAClimate & @IPCC_CH gives users the ability to see what sea levels will look like anywhere for decades to come. Discover more: https://t.co/VAST2xSOyE pic.twitter.com/nePqLntrqv
— NASA (@NASA) August 9, 2021
यामध्ये भारतातील (India in Sea level projection tool) कोची, गोव्यातला मारमुगाव किनारा, भावनगर, मुंबई, ओखा, तुतीकोरीन, पारादीप, मँगलोर, चेन्नई आणि विशाखापट्टणम या शहरांना येत्या काही वर्षांमध्ये धोका असल्याची शक्यता दिसून येत आहे. या शहरांमधील पाणी पातळी (Sea level in Indian coastal cities) येत्या दहा वर्षांमध्ये दोन ते सात इंचांनी, तर येत्या 80 वर्षांमध्ये सुमारे तीन फुटांनी वाढणार आहे. या सर्व शहरांच्या आजूबाजूला अनेक बंदरे आहेत. ही बंदरे (Ports in India) व्यापाराच्या दृष्टिनं महत्त्वाची आहेत. तसंच या शहरांमध्ये लोकवस्तीही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आयपीसीसीचा इशारा गंभीर समजला जातो आहे.
हे वाचा - Explainer : भारताला भोगावे लागणार तापमानवाढीचे दुष्परिणाम, या गोष्टी कारणीभूत
आयपीसीसीने (IPCC data 2021) आपल्या अहवालात म्हटले आहे की, 1850 नंतर चार दशकांमध्ये जेवढी तापमानवाढ झाली नव्हती त्याहून अधिक तापमानवाढ (Global warming in past 4 decades) गेल्या चार दशकांमध्ये झाली आहे. तसंच यापूर्वी जी उष्णतेची लाट (Extreme Heatwave) दर 50 वर्षांनी येत होती ती आता दर दहा वर्षांनी येत असल्याचंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. दरवर्षी जगभरात सुमारे चार कोटी टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन (CO2 emission in world) होतं, हे थांबलं नाही तर पुढील दोन दशकांमध्येच जगाचे तापमान 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढेल असा इशारा आयपीसीसीने दिला आहे.
हे वाचा - Explainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित! शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, टर्की किंवा कॅनडा या देशांमधील जंगलांना आग (Wildfires around the globe) लागण्याच्या घटनाही जागतिक तापमानवाढीमुळेच होत आहेत. एकीकडे जंगले जळून खाक होतायत, तर दुसरीकडे समुद्राची पातळी (Sea level increasing) वाढत आहे. अशाने काहीशे वर्षांमध्ये कित्येक देशांचा बराचसा भाग पाण्याखाली गेलेला असेल, तर बाकी भागामध्ये झाडंच नसल्यामुळे राहण्यास अडचण येईल. यामुळेच 2050 पर्यंत प्रदूषणावर आवर घालून कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन हे 500 कोटी टनपर्यंत खाली आणणं आवश्यक आहे. अन्यथा आपणच करत असलेले प्रदूषण आपल्यासाठी आणि पृथ्वीवरील इतर जीवांसाठी घातक ठरणार आहे असं या अहवालाचे प्रमुख लेखक फ्रेडरिको ओट्टो यांनी म्हटलं आहे. ते ऑक्सफोर्ड विद्यापीठात संशोधक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.