मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer : येत्या काळात भारताला भोगावे लागणार तापमानवाढीचे भयंकर दुष्परिणाम, या गोष्टी ठरणार कारणीभूत

Explainer : येत्या काळात भारताला भोगावे लागणार तापमानवाढीचे भयंकर दुष्परिणाम, या गोष्टी ठरणार कारणीभूत

भारताला उष्णतेच्या लाटा, महापूर आदी नैसर्गिक आपत्तींना (Natural Calamities) मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावं लागेल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे

भारताला उष्णतेच्या लाटा, महापूर आदी नैसर्गिक आपत्तींना (Natural Calamities) मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावं लागेल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे

भारताला उष्णतेच्या लाटा, महापूर आदी नैसर्गिक आपत्तींना (Natural Calamities) मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावं लागेल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे

नवी दिल्ली 10 ऑगस्ट : भारताला येत्या काही काळात तीव्र चक्रीवादळांचा (Severe Cyclones) फटका बसणार आहे. त्यामुळे महापूर येऊ शकतील, हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये हिमकडे कोसळू शकतील आणि त्या सगळ्याच्या परिणामी सागरातल्या पाण्याची पातळी वाढण्याचा धोका आहे. इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज अर्थात IPCC या संस्थेच्या अलीकडच्या अहवालात हा इशारा देण्यात आला आहे.

'क्लायमेट चेंज 2021 : दी फिजिकल सायन्स बेसिस' (Climate Change 2021: The Physical Science Basis) असं या अहवालाचं नाव असून, तो आयपीसीसीचा सहावा विश्लेषण अहवाल आहे. अन्य महासागरांच्या तुलनेत हिंदी महासागराचं तापमान खूप जास्त वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारताला उष्णतेच्या लाटा, महापूर आदी नैसर्गिक आपत्तींना (Natural Calamities) मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावं लागेल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. हा हवामानबदलामुळे होणारा अपरिवर्तनीय बदल असेल, असंही शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

हिंदी महासागराचं तापमान वाढत असल्यामुळे पाण्याची पातळी वाढेल आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आणि वारंवार पूर येतील, असं या अहवालाच्या लेखकांनी म्हटलं आहे.

Explainer: दोन लशींचं कॉकटेल खरंच सुरक्षित आहे का? ICMR चा अभ्यास काय सांगतो?

फ्रेडरिक ओटो हे या अहवालाच्या लेखकांपैकी एक आहेत. ते म्हणतात, 'भारतासारख्या देशात एअरोसोल उत्सर्जनामुळे (Aerosol Emission) उष्णतेच्या वाढत्या लाटेचे परिणाम काही प्रमाणात झाकले जातात; मात्र हवेचा दर्जा चांगला राखण्यासाठी एअरोसोलचं उत्सर्जन घटणं आवश्यक आहे. उष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, हिमनद्या वितळणं (Melting Glaciers) आदी प्रकारांमध्ये वाढ होईल. त्यामुळे भारतासारख्या देशाला समुद्राची पातळी वाढून संबंधित धोक्यांना तोंड द्यावं लागेल. चक्रीवादळं येतील तेव्हा महापुरांचा सामना करावा लागेल. हे दुष्परिणाम दूर करता येणार नाहीत.'

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेटिऑरॉलॉजी (IITM) या संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या स्वप्ना पनिकलदेखील या अहवालाच्या सहलेखिका आहेत. त्या म्हणतात, की समुद्राच्या पाण्याच्या पातळीत (Sea Level Rise) होणाऱ्या वाढीला तापमानवाढ (Global Warming) 50 टक्के कारणीभूत आहे.

अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांच्यासह हिंदी महासागराचं (Indian Ocean) तापमान जागतिक सरासरीच्या तुलनेत वेगाने वाढलं असल्याचं आयपीसीसीने अत्यंत आत्मविश्वासाने सांगितलं आहे. जागतिक तापमानात जेव्हा 1.5 अंश ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होईल, तेव्हा हिंदी महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे, असं आयपीसीसीने 9 ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या ओशन्स फॅक्टशीटमधून स्पष्ट होत आहे.

EXPLAINER : एका वर्षात भारतात येणार Flexi Fuel गाड्या, इंधनाचे दर घसरणार!

'हिंदी महासागराच्या प्रदेशाचं तापमान वेगाने वाढत आहे. त्याचाच अर्थ असा, की त्या भागात सागरी पातळीही वाढणार आहे. 21व्या शतकात किनारी भागांमध्ये समुद्राची पातळी वाढलेली दिसेल. त्यामुळे किनारी भागांमध्ये वारंवार आणि जास्त भयानक पूर येतील. किनारपट्टीची झीज होईल. सखल भागांमध्ये पाणी भरेल. तसंच, सागराच्या पाणीपातळीशी संबंधित असलेल्या अति तीव्रतेच्या दुर्घटना पूर्वी शंभरेक वर्षांतून एकदाच घडायच्या, त्या जवळपास प्रत्येक वर्षीच अनुभवता येतील, अशी स्थिती या शतकाच्या अखेरीपर्यंत निर्माण होऊ शकते,' असं पनिकल यांनी म्हटलं आहे.

मानवी कृत्यांमुळेच हवामानबदल (Climate Change), तापमानवाढ हे दुष्परिणाम घडत आहेत, यात कोणतीच शंका नाही, असंही या अहवालात म्हटलं आहे. 'माणसाच्या वेगवेगळ्या कृतींमुळे 1970च्या दशकापासून समुद्राचं तापमान वाढू लागलं. समुद्राची आम्लताही वाढू लागली. तसंच, पृथ्वीच्या बर्फाळ प्रदेशांमध्येही बदल घडून येऊ लागले. 1990च्या दशकापासून आर्क्टिक समुद्रातल्या बर्फाचं प्रमाण 40 टक्क्यांनी घट झाली आहे. 1950च्या दशकापासून स्प्रिंग सीझनमधल्या बर्फाच्छादनातही घट दिसून येत आहे,' असं त्या अहवालात म्हटलं आहे.

Explainer : भारत आणि पाकिस्तानसाठी गिलगिट-बाल्टिस्तान का आहे महत्त्वाचं?

येत्या 20-30 वर्षांत भारतातल्या पावसाच्या अंतर्गत विविधतेच्या पलीकडे पाऊसमानात (Rains) फारशी वाढ दिसणार नाही; पण 21व्या शतकाच्या अखेरीपर्यंत वार्षिक, तसंच उन्हाळी मान्सून हंगामात पडणाऱ्या पावसाचं प्रमाण वाढलेलं असेल, असं या अहवालात म्हटलं आहे. तसंच, 21व्या शतकात तापमान वाढण्याचे प्रकार जास्त वेळा घडतील; मात्र तापमान कमी होण्याच्या घटनांचं प्रमाण कमी होत जाईल, असं पनिकल यांनी म्हटलं आहे.

हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात मोठ्या प्रमाणावर घट केली नाही, तर जागतिक तापमानवाढीला दीड ते 2 अंश सेल्सिअसच्या मर्यादेत राखणं हाताबाहेर जाईल, असा इशाराही पनिकल यांनी दिला आहे.

जगाचं तापमान दोन अंश सेल्सिअसने वाढलं, तर वणवे लागण्याची वारंवारिता आणि प्रमाण या दोन्हींमध्ये वाढ होईल. त्याचा सर्वांत जास्त फटका भारत, चीन, रशिया या देशांना बसेल, असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे.

First published:

Tags: Climate change, India, Rain flood