Home /News /mumbai /

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना संजय राऊत चर्चेसाठी मुंबईत का बोलवत आहेत?

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना संजय राऊत चर्चेसाठी मुंबईत का बोलवत आहेत?

मुंबईपासून दूर राहून पत्रव्यवहार किंवा फोनवरुन परिणामकारक चर्चा होणार नाही याची कल्पना शिवसेनेला आहे. आमदार समोर आल्यानंतर त्यांच्यासोबतची चर्चा करुन त्यांचं मन वळवणे जास्त सोपं होऊ शकतो.

मुंबई, 23 जून : संजय राऊत सर्व बंडखोर आमदारांना मुंबईत का बोलवत आहेत. चर्चा करण्यासाठी मुंबईच का असा प्रश्नही निर्माण होता आहे. मात्र मुंबईत बोलवण्यासाठी खास कारण आहे. शरद पवार यांनी दिलेला सल्ला शिवसेना ऐकत असल्याचं एकूणच दिसून येत आहे. कारण मुंबईत आल्यानंतर सर्व बंडखोर आमदारांशी चर्चा करुन त्याचं मन वळण्यासाठी शिवसेनेला वेळ मिळेल. मुंबईत उद्धव ठाकरे त्यांना भावनिक आवाहन करू शकतात. शिवसेना कार्यकर्त्यांचं जे आंदोलन सुरू आहे, त्याचाही त्यांच्यावर भावनिक दबाव वाढू शकतो. मुंबईपासून दूर राहून पत्रव्यवहार किंवा फोनवरुन परिणामकारक चर्चा होणार नाही याची कल्पना शिवसेनेला असावी. आमदार समोर आल्यानंतर त्यांच्यासोबतची चर्चा करुन त्यांचं मन वळवणे जास्त सोपं होऊ शकतो. म्हणूनच संजय राऊत पत्रकार परिषदेत वारंवार आमदारांना मुंबईत येण्याचं आवाहन करत असावेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांशी मुंबईत चर्चा केल्यास त्यांना विचार करण्यासाठीही वेळ मिळेल. जेणेकरून काही आमदारांचा जरी विचार बदलला तरी शिंदे गटाच्या अडचणी वाढतील. ज्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी आणि सत्तांतरासाठी लागणारी मॅजिक फिगर गाठणे शिंदे गटाला सोपं होणार नाही. Eknath Shinde Guwahati : नितीन देशमुख पळून नाही तर सन्मानाने परत गेले, शिंदे गटाकडून देशमुखांचा भांडाफोड शरद पवारही यांनी काय म्हटलं? एकनाथ शिंदे आणि सोबत असलेल्या बंडखोर आमदारांना सर्वात आधी महाराष्ट्रात येऊ द्या ,असंतोष तयार करून आमदार वळवता येतात का ते तपासा आणि तोपर्यंत तांत्रिक मुद्द्यांवर पेच वाढवत न्या, असा सल्ला शरद पवारांनी दिली आहे. भाजप करणार सरकार स्थापनेचा दावा; सोमवारी शपथविधी होणार? वरिष्ठ नेत्यानी दिली महत्त्वाची माहिती ...तर सरकारमधून बाहेर पडण्याबाबत विचार होईल : संजय राऊत संजय राऊत यांनी आता बंडखोर आमदारांना 24 तासात परत येण्याचं आवाहन केलं आहे. तुम्ही परत या. सरकारमधून बाहेर पडण्याबाबत विचार होईल. तुमचं म्हणणं ऐकून घेऊ. तुमच्या भूमिकेवर विचार करू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  21 आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला असल्याचं राऊत म्हणाले आहेत. ज्यादिवशी मुंबईला येतील तेव्हा 21 आमदार शिवसेनेसोबत असतील. सर्वांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. तर भाजपने नेलेल्या आमदारांपैकी 2 आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील परत आले आहेत, असं ते म्हणाले. इथे सर्व मिळून भाजपने अपहरण केलेले 23 आमदार मुंबईत येताच आपल्यासोबत येणार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. महाविकास आघाडीचा विजय होईल इतका आकडा आमच्याकडे आहे, असा दावा ऱाऊतांनी केला आहे.
Published by:Pravin Wakchoure
First published:

Tags: Sanjay raut, Shivsena, Uddhav thacakrey

पुढील बातम्या