Home /News /maharashtra /

Eknath Shinde Guwahati : नितीन देशमुख पळून नाही तर सन्मानाने परत गेले, शिंदे गटाकडून देशमुखांचा भांडाफोड

Eknath Shinde Guwahati : नितीन देशमुख पळून नाही तर सन्मानाने परत गेले, शिंदे गटाकडून देशमुखांचा भांडाफोड

शिवसेनेचे (shiv sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde guwahati) यांच्याकडे आज 40 पेक्षा जास्त आमदार (mla) आहेत. हे सर्व आमदार सध्या गुवाहाटी येथे मुक्कामी आहेत

  मुंबई, 23 जून : शिवसेनेचे (shiv sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde guwahati) यांच्याकडे आज 40 पेक्षा जास्त आमदार (mla) आहेत. हे सर्व आमदार सध्या गुवाहाटी येथे मुक्कामी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी आमदारांना परतण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर बंडखोर आमदारांसोबत गेलेले गुवाहाटी येथून परतलेले शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख (shiv sena mla guwahati) यांनी बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन केले. त्यांनी कशापद्धतीने वागवण्यात आले याचा वृत्तांत यांनी माध्यमांसमोर मांडला. नितीन देशमुख म्हणतात मी पळून आलो परंतु एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून हे दावे खोटे असल्याने सांगण्यात आले आहे.

  शिंदे गटाकडून नितीन देशमुख चार्टर फ्लाइटमधील रिलीज करण्यात आले आहेत. त्यांचे कोणीही अपहरण केले नसल्याचेही सांगण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून मुंबईत पोहोचवल्याचे फोटो नितीन देशमुख यांना व्यवस्थित पाठवल्याचे दिसत असल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. शिंदे गटाकडून त्यांचे अपहरण झाले नसल्याचेही सांगण्यात आले.

  हे ही वाचा : भाजप करणार सरकार स्थापनेचा दावा; सोमवारी शपथविधी होणार? वरिष्ठ नेत्यानी दिली महत्त्वाची माहिती

  नितीन देशमुख काय म्हणाले

  मला हार्ट अटॅक आल्याचा बनाव रचण्यात आला. मला रुग्णालयात नेल्यानंतर 20 ते 25 जणांनी मला पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचले गेले. ते इंजेक्शन काय होतं माहिती नाही. माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचे षडयंत्र रचले होते. मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मी मंत्र्यांसोबत गेलो होतो, पण मी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आता मी माझ्या घरी जात आहे. असे देशमुख म्हणाले.

  या सर्व घडामोडीच्या मागे नाव एकनाथ शिंदे यांचे असले तरी यामागे भाजपा आहे. नितीन देशमुख म्हणून मला लोकांनी मत दिले नाही. माझ्या पदाधिकऱ्यांनी माझ्या विजयासाठी जीवाचे रान केले आहे. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून दिले आहे. आज काही आमदार गुवाहाटीमध्ये गेले आहेत. कोणी दुसऱ्यांदा तर कोणी तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. माझी त्यांना एक विनंती आहे. तुम्ही आमदार झाले आहेत. तुम्ही स्वबळावर आमदार झाले नाही आहात. आपल्या मागे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद होता.

  शिवसैनिकांनी आपल्यासाठी जीवाचे रान केले आहे. ज्या मतदारांनी तुम्हाला शिवसैनिक म्हणून निवडून दिले त्यांचा आदर करा. या सर्व गोष्टीचा विचार करुन परत या. आज तुम्ही गेलात उद्या संपून जाल, असे देशमुख म्हणाले.

  हे ही वाचा : 'आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहचल्याच नाहीत!' शिवसेना आमदाराचा 'लेटरबॉम्ब', वाचा खळबळजनक पत्र

  तसेच, ज्या बाळासाहेबांच्या नावावर मोठे झाले, त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे आज देशाचे मुख्यमंत्री आहेत. हे सर्व भाजापचे षड्यंत्र आहे. काही आमदार ईडीच्या दबावाला बळी पडले आहेत. बऱ्याच नेत्यांवर ईडीचा दबाव टाकून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. भाजपात धमक असेल तर निवडणुका लावून दाखवा. जनतेसमोर या. जनतेची ताकद तुम्हाला कळेल. माझी इच्छा आहे की निवडणुका लागायला पाहिजेत. तेव्हाच कोणाची ताकद कळेल, असे आव्हानदेखील त्यांनी भाजपला दिले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या