मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /भाजप करणार सरकार स्थापनेचा दावा; सोमवारी शपथविधी होणार? वरिष्ठ नेत्यानी दिली महत्त्वाची माहिती

भाजप करणार सरकार स्थापनेचा दावा; सोमवारी शपथविधी होणार? वरिष्ठ नेत्यानी दिली महत्त्वाची माहिती

भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 शिवसेना आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र तयार आहे. शिंदे 40 हून आमदारांचा पाठिंबा जाहीर करतील त्यानंतर भाजप राज्यपालांना पत्र लिहून सरकार स्थापनेचा दावा करेल.

मुंबई 23 जून : राज्यात सध्या राजकीय भूकंप आलेला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. अजूनही शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात आता एकनाथ शिंदेंचा नेमका प्लॅन काय आहे, याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 शिवसेना आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र तयार आहे. शिंदे 40 हून आमदारांचा पाठिंबा जाहीर करतील त्यानंतर भाजप राज्यपालांना पत्र लिहून सरकार स्थापनेचा दावा करेल. यानंतर सोमवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे, असं या नेत्याने सांगितलं आहे.

दादा भुसे आणि संजय राठोड हॉटेलमध्ये दाखल होताच हे पत्र घेऊन जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय आणखीही काही आमदार शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याचं समोर येत आहेत. अशात नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेच्या शिंदे गटाची आमदार संख्या पन्नासवर पोहोचणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे लोकसभेत 18 खासदार असून त्यातील अनेक खासदार आपला नवा गट स्थापन करणार आहेत. ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे आणि कल्याण लोकसभा खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे सध्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात आहेत. वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती आहे.

आणखी अनेक खासदार एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ उतरणार आहेत. पालघरचे खासदार राजेंद्र गावित हेदेखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. अशात आता आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदारही एकनाथ शिंदेंच्या समर्थनात उतरल्याने उद्धव ठाकरेंच्या चिंतेत आणखीच वाढ झाली आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Eknath Shinde, Maharashtra News, Shivsena