Home /News /mumbai /

'आता गाडी खूप पुढे गेली आहे'; संजय राऊतांच्या 'परत या' आवाहानानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

'आता गाडी खूप पुढे गेली आहे'; संजय राऊतांच्या 'परत या' आवाहानानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

आमच्याकडे 40 आमदार असल्याने माघारी जाण्याचा प्रश्नच नाही. आता गाडी खूप पुढे गेली आहे. आम्ही बैठक घेऊन पुढे काय करणार हे सांगू. बहुमत आमच्याकडेच आहे, याबाबत आम्हाला खात्री आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

    मुंबई 23 जून : नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. अगदी जीव धोक्यात घालून मी स्वतःची सुटका केली, असा दावा त्यांनी यात केला. यावर आता एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मी स्वतः आमची काही लोकं त्यांना सोडवण्यासाठी पाठवली होती. त्यांचे सर्व आरोप निराधार असल्याचं शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत. हे सर्व खोटं असल्याचा दावा त्यांनी केला आहे. Eknath Shinde Guwahati : नितीन देशमुख पळून नाही तर सन्मानाने परत गेले, शिंदे गटाकडून देशमुखांचा भांडाफोड दुसरीकडे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या परिषदेत बंडखोर आमदारांना असं आवाहन केलं होतं की तुम्ही २४ तासात परत या. तुम्ही परत या. सरकारमधून बाहेर पडण्याबाबत विचार होईल. तुमचं म्हणणं ऐकून घेऊ. तुमच्या भूमिकेवर विचार करू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावरही एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना संजय राऊत चर्चेसाठी मुंबईत का बोलवत आहेत? काय आहे प्लान? आमच्याकडे 40 आमदार असल्याने माघारी जाण्याचा प्रश्नच नाही. आता गाडी खूप पुढे गेली आहे. आम्ही बैठक घेऊन पुढे काय करणार हे सांगू. बहुमत आमच्याकडेच आहे, याबाबत आम्हाला खात्री आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. दुसरीकडे भाजपच्या ताब्यातीला 21 आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला असल्याचं राऊत म्हणाले आहेत. ज्यादिवशी मुंबईला येतील तेव्हा 21 आमदार शिवसेनेसोबत असतील. सर्वांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. तर भाजपने नेलेल्या आमदारांपैकी 2 आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील परत आले आहेत, असं ते म्हणाले. इथे सर्व मिळून भाजपने अपहरण केलेले 23 आमदार मुंबईत येताच आपल्यासोबत येणार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. महाविकास आघाडीचा विजय होईल इतका आकडा आमच्याकडे आहे, असा दावा ऱाऊतांनी केला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Sanjay raut

    पुढील बातम्या