Maharshtra Political Crises: उद्याची बहुमत चाचणी कुणाच्या अध्यक्षतेखाली होणार?
Maharshtra Political Crises: उद्याची बहुमत चाचणी कुणाच्या अध्यक्षतेखाली होणार?
सध्या विधानसभा अध्यक्ष पद रिक्त आहे. त्यामुळे कामकाज उपाध्यक्ष नरहरी झिरवळ पाहत आहेत. मात्र उद्याची बहुमत चाचणी देखील त्यांच्या अध्यक्षतेखाली घेतली जाऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे.
मुंबई, 29 जून : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर ठाकरे सकारनं बहुमत गमावलं असं मानलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हे आदेश दिले आहेत. उद्या (गुरूवारी) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला दिले आहेत. मात्र उद्याची बहुमत चाचणी कुणाच्या अध्यक्षतेखाली पार पडणार हा मोठा प्रश्न आहे.
सध्या विधानसभा अध्यक्ष पद रिक्त आहे. त्यामुळे कामकाज उपाध्यक्ष नरहरी झिरवळ पाहत आहेत. मात्र उद्याची बहुमत चाचणी देखील त्यांच्या अध्यक्षतेखाली घेतली जाऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे. बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्ष अध्यक्ष निवडले जाणार नाहीत अशीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जेणेकरुन नरहरी झिरवळ यांच्या अधिकारांचा काहीसा फायदा महाविकास आघाडी सरकारला होतो का हे पाहावं लागेल.
राज्यपालांची मोठी खेळी, अधिवेशनासाठी ठाकरे सरकारला घालून दिले नियममहाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयाच जाणार?
राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहे. पण, आता महाविकास आघाडी सरकार हे सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. विधानसभा उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या 16 आमदारांवर कारवाई करू नये, असा आदेश दिला. कोर्टाने हा आदेश दिल्यानंतर वकिलांनी मधल्या काळात बहुमताची चाचणी घ्यायला सांगितली तर काय करायचं? असा प्रश्न विचारला. यावर बोलताना कोर्टाने ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत त्यावर निर्णय कसा द्यायचा म्हणून उत्तर दिलं. तसंच बहुमत चाचणीची परिस्थिती उद्भवली तर पुन्हा कोर्टात या सांगितलं आहे.
ठाकरे सरकारचा उद्या फैसला, वाचा राज्यपालांच्या पत्रातील 7 महत्त्वाचे मुद्दे
राज्यपालांनी विधानभवनात अधिवेशनासाठी आमदार आल्यानंतर एकूण किती आमदार उपस्थितीत आहे याची शिरगणना करावी असं राज्यपालांनी सांगितलं आहे.त्यामुळे सभागृहामध्ये किती आमदार उपस्थितीत आहे. याची नोंद करावी, अशी सूचना राज्यपालांनी केली आहे. तसंच, उपाध्यक्षांना आवाजी मतदान घेऊ नये, सभागृह बरखास्त करू नये, अशी सूचनाही राज्यपालांनी दिली आहे. त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना आवाजी मतदान घेता येणार नाही. त्याचबरोबर सभागृह बरखास्त सुद्धा करता येणार नाही. एवढंच नाहीतर अधिवेशनाचे लाईव्ह ब्रॉडकॉस्ट होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.