मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज्यपालांची मोठी खेळी, अधिवेशनासाठी ठाकरे सरकारला घालून दिले नियम

राज्यपालांची मोठी खेळी, अधिवेशनासाठी ठाकरे सरकारला घालून दिले नियम

 उद्या गुरुवारी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची सूचना केली आहे.

उद्या गुरुवारी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची सूचना केली आहे.

उद्या गुरुवारी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची सूचना केली आहे.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, २९ जून : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) राजकीय नाट्याला नवे वळण मिळाले आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहे. तसंच राज्यपालांनी (Governor Bhagat Singh Koshyari) अधिवेशनात आमदारांची मोजणी करण्याची सूचना केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या (BJP) प्रमुख नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची मंगळवारी भेट घेतली. या भेटीमध्ये भाजपने महाविकासआघाडी सरकार अल्पमतात असून लवकरात लवकर बहुमत चाचणी घ्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर राज्यपालांनी हे पत्र लिहलं आहे. राज्यपालांच्या या पत्रानंतर आता उद्धव ठाकरे सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल. उद्या गुरुवारी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची सूचना केली आहे. पण, राज्यपालांनी विधानभवना अधिवेशनात आमदार आल्यानंतर एकूण किती आमदार उपस्थितीत आहे याची शिरगणना करावी असं राज्यपालांनी सांगितलं आहे.त्यामुळे सभागृहामध्ये किती आमदार उपस्थितीत आहे. याची नोंद करावी, अशी सूचना राज्यपालांनी केली आहे. तसंच, उपाध्यक्षांना आवाजी मतदान घेऊ नये, सभागृह बरखास्त करू नये, अशी सूचनाही राज्यपालांनी दिली आहे. त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना आवाजी मतदान घेता येणार नाही. त्याचबरोबर सभागृह बरखास्त सुद्धा करता येणार नाही. एवढंच नाहीतर अधिवेशनाचे लाईव्ह ब्रॉडकॉस्ट होणार आहे. दरम्यान, आम्ही उद्या मुंबईत जाणार आहोत अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये दिली आहे. शिंदे यांनी बुधवारी सकाळी गुवाहाटीमधील कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.
First published:

पुढील बातम्या