Home /News /mumbai /

ठाकरे सरकारचा उद्या फैसला, वाचा राज्यपालांच्या पत्रातील 7 महत्त्वाचे मुद्दे

ठाकरे सरकारचा उद्या फैसला, वाचा राज्यपालांच्या पत्रातील 7 महत्त्वाचे मुद्दे

राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा गुरूवार हा निर्णायक दिवस असेल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

    मुंबई, 29 जून : राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा गुरूवार हा निर्णायक दिवस असेल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यपालांनी गुरूवारीच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश ठाकरे सरकारला दिले आहेत. त्यामुळे हे सरकार राहणार की जाणार? याचा निर्णय आता गुरूवारी होणार आहे. राज्यपालांच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे -राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात आलेल्या बातम्या चिंताजनक आहेत. 39 आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे सविस्तर वृत्तांकन या माध्यमांनी केले आहे. -7 अपक्ष आमदारांचा ईमेल राजभवनाला 28 जून रोजी मिळाला आहे. या ईमेलमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहातील बहुमत गमावले असून लवकरात लवकर विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे -विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी 28 जून रोजी माझी भेट घेतली. त्यांनी मला राज्यातील परिस्थितीची माहिती दिली.मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बहुमत गमावल्याचा दावा त्यांनी केला आहे. -राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून सरकारला सभागृहाचा पाठिंबा आणि विश्वास आहे, याची खात्री करण्याचा मला अधिकार आहे.त्यामुळे मी 30 जून रोजी विशेष अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध करावे असे निर्देश देतो. - 30 जून रोजी सकाळी 11 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे. या अधिवेशनात राज्य सरकारनं बहुमत सिद्ध करावे. विधानसभेचे कामकाज कोणत्याही परिस्थितीमध्ये गुरूवारी संध्याकाळी 5 वाजता समाप्त व्हावे. -काही नेत्यांची प्रक्षोभत वक्तव्य लक्षात घेता विधिमंडळाच्या परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात यावी -विधिमंडळाच्या कामकाजाचे प्रक्षेपण लाईव्ह करण्यात यावे. त्यासंबंधीची सर्व तयारी करावी
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Eknath Shinde, Uddhav tahckeray

    पुढील बातम्या