मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Kasba by-election : कसबा चिंचवडमध्ये मनसेचा पाठिंबा कोणाला? मोठी अपडेट समोर

Kasba by-election : कसबा चिंचवडमध्ये मनसेचा पाठिंबा कोणाला? मोठी अपडेट समोर

राज ठाकरे

राज ठाकरे

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत मनसे काय भूमिका घेणार, भाजपला पाठिंबा देणार का? याबाबत सर्वांना उत्सुकता होती. अखेर मनसेने आपली भूमिका जाहीर केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 8 फेब्रुवारी :  भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभेचे मतदारसंघ रिक्त झाले आहेत. या जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली असून, येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. आजपासून प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. मात्र या निवडणुकीत मनसे काय भूमिका घेणार, भाजपला पाठिंबा देणार का? याबाबत सर्वांना उत्सुकता होती. अखेर मनसेने आपली भूमिका जाहीर केली आहे.

प्रचारात सहभागी न होण्याचे आदेश 

मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांचे आदेश येईपर्यंत कोणाच्याही प्रचारात सहभागी होऊ नका, असे आदेश मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना तसेच मनसेसैनिकांना दिले आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात मनसे तटस्थ राहणार का? हे पहावं लागणार आहे.

चिंचवडमध्ये तिरंगी लढत  

कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून टिळक वाड्याला डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कसबा मतदारसंघामधून महिविकास आघाडीने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कसब्यात रवींद्र धंगेकर आणि रासने यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे. तर चिंचवडमध्ये तिंरगी लढत होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे कोणाला पाठिंबा देणार या कडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र मनसेनं सध्या तरी तटस्थतेची भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे.

First published:

Tags: Pune