मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'हे तर सुडाचे राजकारण', उद्धव ठाकरेंना न बोलवल्यामुळे संजय राऊत सरकारवर भडकले

'हे तर सुडाचे राजकारण', उद्धव ठाकरेंना न बोलवल्यामुळे संजय राऊत सरकारवर भडकले


'बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावलं जाणार आहे, पण त्यासाठी त्यांचे सुपुत्र आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांना सन्मानाने बोलावलं जात नाही.

'बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावलं जाणार आहे, पण त्यासाठी त्यांचे सुपुत्र आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांना सन्मानाने बोलावलं जात नाही.

'बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावलं जाणार आहे, पण त्यासाठी त्यांचे सुपुत्र आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांना सन्मानाने बोलावलं जात नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 जानेवारी : 'बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावलं जाणार आहे, पण त्यासाठी त्यांचे चिरंजिव आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांना सन्मानाने बोलावलं जात नाही. उद्धव ठाकरे म्हणायचे, बाप पळवणारी टोळी आली आहे. त्यामध्ये तथ्य आहे', असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका केली.

23 जानेवारीच्या विधानभवनातल्या बाळासाहेब ठाकरे तैलचित्र अनावरण होणार आहे. पण या कार्यक्रमाचे उद्धव ठाकरे यांचं नाव त्या पत्रिकेत नाही. त्यामुळे संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

(राज ठाकरेंचा स्वॅगच वेगळा, कोर्टात हजर राहण्यासाठी निघाले हेलिकॉप्टरने, औरंगाबादला घेतला हुरडा पार्टीचा आस्वाद!)

'बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावलं जाणार आहे, पण त्यासाठी त्यांचे सुपुत्र आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांना सन्मानाने बोलावलं जात नाही. उद्धव ठाकरे म्हणायचे, बाप पळवणारी टोळी आली आहे. त्यामध्ये तथ्य आहे. शिवसेनाप्रमुखांचं तैलचित्र लावताय आणि उद्धव ठाकरेंना बोलवत नाही. ज्यावेळी आम्ही सावरकरांचं तैलचित्र लावलं होतं, त्यावेळी आम्ही त्यांच्या नातेवाईकांना बोलावलं, त्यांचं नाव सुद्धा कार्डवर होतं. पण विधानसभा चालवत असताना कोणतीही प्रथा परंपरा पाळली जात नाही', अशी नाराजीही संजय राऊतांनी बोलावून दाखवली.

(शिंदे गटाचा आता मनसेला धक्का! नागपूरमधील महिला नेत्याचा कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश)

देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षनेते होते, त्यावेळी त्यांना बोलावले जात नव्हते, याचा हा बदला घेतला जात आहे का, असं विचारलं असता, राऊत म्हणाले की, 'बदला घेता की नाही हे मी सांगू शकत नाही. पण राज्यात सूड आणि बदला घेण्याचे राजकारण सुरू आहे' अशी टीकाही राऊत यांनी केली.

युवासेनेनं जे विषय उचलला आहे, त्याबद्दल सरकार उत्तर देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कामाच्या उद्घाटनासाठी मुंबईमध्ये येणार आहे, त्या कामाचे मुंबई महापालिका आणि मविआने केली आहे. शिवसेनेनं सुरू केलेल्या कामाची पायाभरणी करण्यासाठी मोदी इथं येत आहे, एका प्रकारे आमच्या कामावर शिक्कामोर्तब होत आहे. याचा आनंद आहे, असंही राऊत म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Sanjay raut, Shivsena