मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंदे गटाचा आता मनसेला धक्का! नागपूरमधील महिला नेत्याचा कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश

शिंदे गटाचा आता मनसेला धक्का! नागपूरमधील महिला नेत्याचा कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश

शिंदे गटाचा आता मनसेला धक्का!

शिंदे गटाचा आता मनसेला धक्का!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात आता मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India
  • Published by:  Rahul Punde

नागपूर : 17 जानेवारी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड केल्यानंतर ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. ठाकरे गटातील आमदार, खासदारांसोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. इतकेच नाही तर विरोधी पक्षातील लोकंही शिंदे गटात सहभागी होत आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विदर्भातील विश्वासू, निष्ठावंत ओबीसी समाजाचे नेते रामेश्वर पवळ यांनी नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला. दरम्यान, आता शिंदे गटाने आपला मोर्चा राज ठाकरे यांच्या मनसे नेत्यांकडे वळवलेला दिसत आहे.

मनसेच्या शहर अध्यक्षा शिंदे गटात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नागपूर महिला शहर अध्यक्ष मनिषा पापडकर यांनी शिंदे गटाचे पूर्व विदर्भाचे प्रमुख  किरण पांडव यांच्या हस्ते आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये अधिकृत प्रवेश घेतला. मनिषा पापडकर यांच्यासोबत त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे. लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे मनिषा पापडकर यांनी प्रवेश घेतल्यानंतर सांगितले.

वाचा - राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट! मनसे प्रमुख उद्या बीडच्या परळी कोर्टात हजर राहणार, काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी शरद पवारांचे विश्वासू रामेश्वर पवळ शिंदे गटात

राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजकारणाला कंटाळून पवळ हे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भेटीसाठी बोलावून घेतले होते. पवळ हे शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षात होते. रामेश्वर पवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवादलाचे अकोला जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवादलाचे विभागीय समन्वयक, प्रदेश संघटन सचिव, लोकसभा पक्ष निरीक्षक, प्रदेश चिटणीस, प्रदेश संघटक पदावर काम केले आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर पवळ यांना डावलण्यात आले होते. पक्षात डावलले जात असल्याचे लक्षात येताच पवळ हे मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादीत नाराज होते.

ठाकरे गटातील उर्वरित आमदार, खासदार निवडणुकीपूर्वी शिंदे गटात येणार : जाधव

बुलडाणा जिल्ह्याचे शिंदे गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा नवीन गौप्यस्फोट केला आहे. ठाकरे गटातील राहिलेले आमदार खासदार हे निवडणुकीपूर्वी शिंदे गटात सहभागी होतील, असे बोलून एकच खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटाचे आमदार, खासदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र, त्यांच्या काही स्थानिक अडचणी असल्याने ते ठाकरे गटात आहेत. मात्र, निवडणुकी पूर्वी ठाकरे गट हा रिकामा झालेला दिसेल असं धक्कादायक विधान करून खळबळ माजवून दिली आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Raj thacarey