मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज ठाकरेंचा स्वॅगच वेगळा, कोर्टात हजर राहण्यासाठी निघाले हेलिकॉप्टरने, औरंगाबादला घेतला हुरडा पार्टीचा आस्वाद!

राज ठाकरेंचा स्वॅगच वेगळा, कोर्टात हजर राहण्यासाठी निघाले हेलिकॉप्टरने, औरंगाबादला घेतला हुरडा पार्टीचा आस्वाद!

मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर‎ केलेल्या दगडफेक प्रकरणी तारखेला सतत गैरहजर राहिल्याने परळी‎ न्यायालयाने राज ठाकरेंना‎ अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर‎ केलेल्या दगडफेक प्रकरणी तारखेला सतत गैरहजर राहिल्याने परळी‎ न्यायालयाने राज ठाकरेंना‎ अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर‎ केलेल्या दगडफेक प्रकरणी तारखेला सतत गैरहजर राहिल्याने परळी‎ न्यायालयाने राज ठाकरेंना‎ अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad Cantonment, India
  • Published by:  sachin Salve

अविनाश कानडजे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 18 जानेवारी : चिथावणीखोर वक्तव्य आणि कार्यकर्त्यांकडून एसटी बसवर दगडफेक प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज परळी कोर्टामध्ये हजर होणार आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरे हे परळीला हेलिकॉप्टरने रवाना झाले आहे. औरंगाबादमध्ये थांबले असता राज ठाकरेंनी हुरडा पार्टीचा आस्वाद घेतला.

2008 मध्ये राज ठाकरेंना अटक झाल्यानंतर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि जाळपोळ केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले होते. याच एका प्रकरणात राज ठाकरेंना परळी कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. त्यामुळे  सकाळीच ते मुंबईहून हेलिकॉप्टरने परळीला रवाना झाले आहे.  काही वेळापूर्वीच  राज ठाकरे हे औरंगाबादमध्ये पळशी हेलिपॅडवर उतरले आहेत. इंधन भरल्यानंतर ते इथून परळीला निघतील मात्र त्या अगोदर राज ठाकरे हे पळशी हेडीपॅडवर ज्वारीच्या हुरड्याचा आस्वाद घेतला आहे. राज यांच्यासाठी पदाधिकाऱ्यांनी खास अशा हुरडा पार्टीचे आयोजन केले होते.

(शिंदे गटाचा आता मनसेला धक्का! नागपूरमधील महिला नेत्याचा कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश)

चिथावणीखोर वक्तव्य आणि‎ मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर‎ केलेल्या दगडफेक प्रकरणी तारखेला सतत गैरहजर राहिल्याने परळी‎ न्यायालयाने राज ठाकरेंना‎ अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्या प्रकरणात जामीन घेण्यासाठी ते आज परळी कोर्टात हजर होणार आहेत. हेलिकॉप्टरने सकाळी दहा वाजता पांगरी येथील गोपीनाथ गड येथे ते येणार आहेत. त्यानंतर परळी कोर्टात हजर राहणार आहेत. त्यानंतर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुपारी दीड वाजता ते परत मुंबईला रवाना होणार होतील.

(रंगमंचावर उलघडणार ठाकरे काका-पुतण्याचं नातं; यादिवशी होणार 'बाळासाहेबांचा राज' नाटकाचा पहिला प्रयोग)

2008 मध्ये मध्ये राज‎ ठाकरे यांना एका प्रकरणात मुंबईत‎ अटक करण्यात आल्यांनतर या‎ अटकेचे पडसाद परळीतही उमटले‎ होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर‎ मनसे कार्यकर्त्यांनी बसवर‎ दगडफेक केल्यानंतर मनसेच्या‎ कार्यकत्यांवर आणि राज ठाकरे‎ यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.‎ पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल‎ केल्यानंतर राज ठाकरे परळीच्या‎ न्यायालयात तारखेला गैरहजर‎ राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध‎ अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.‎ या पूर्वी ३ आणि १२ जानेवारीला राज ठाकरेंना परळी‎ न्यायालयात हजर राहण्यास‎ सांगितले होते. परंतु, काही कारणामुळे ते येवू शकले नव्हते. मात्र, उद्या सकाळी ते परळी न्यायालयात हजर होणार आहेत.

First published:

Tags: मनसे, राज ठाकरे