ठाणे, 24 एप्रिल : मुंबईत दररोज रुग्णसंख्या वाढते आहे. कमी झालेली प्रतिबंधित क्षेत्र पुन्हा वाढली आहेत. त्याच वेळी ठाण्यातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. आज दिवसभरात ठाणे महापालिका हद्दीत 20 कोरोनाबाधित दाखल झाले. ठाण्यात पहिल्यांदाच एका दिवसात एवढी रुग्णसंख्या वाढली आहे. ठाण्यात आता कोरोनारुग्णांची संख्या 198 झाली आहे. 163 रुग्ण प्रत्यक्ष शहरात उपचार घेत आहेत. देशातील कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) रुग्णसंख्येने 23000 चा टप्पा पार केला असून मुंबईतील (Mumbai) धोका कायम आहे. आज मुंबईत कोरोनाचे (Covid -19) 522 रुग्णांची नोंद करण्यात आली असून आता येथील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4000 पार गेली आहे. आज मुंबईत 357 नवे रुग्ण दाखल झाले. आता कोरोनाबाधितांची संख्या 4589 झाली आहे. आज 11 मृत्यूंची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत एकूण 179 मृत्यू झाले आहेत. कोरोना योद्ध्यांवर हल्ला केलेले 5 जणं पॉझिटिव्ह; तुरुंगातून रुग्णालयात रवानगी मुंबईतील धोका लक्षात घेता प्रतिबंधित क्षेत्रातील संख्येतही मोठी वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत मुंबईत 813 प्रतिबंधित क्षेत्र होते त्यामध्ये वाढ करीत आता मुंबईतील हॉटस्पॉटची संख्या 930 पर्यंत पोहोचली आहे. भायखळा, कुर्ला, अंधेरी पश्चिम, लोअर परेल, अंधेरी पूर्व, मालाड या भागात प्रतिबंधित क्षेत्र आहेत. तर यापैकी 189 भागातील प्रतिबंध हटवण्यात आला आहे. …अन्यथा कोरोनारुग्णांची संख्या गेली असती 73000 वर; महत्त्वाचं कारण केलं उघड दुसरीकडे मुंबईतही रुग्णसंख्या सातत्याने वाढते आहे. मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 522 रूग्णसंख्या वाढली आहे. काल मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या 3683 इतकी होती आज ती 4205 इतकी झाली आहे. राज्यातील मुंबई, पुणे, मालेगाव या भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. पुण्यातही संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्राची संख्या वाढवण्यात आली आहे. लॉकडाऊन असतानाही अनेकदा विविध कारणांनी लोक रस्त्यांवर गर्दी करतात. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा लोकांकडून याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. मुंबई आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत आज 25 नवे रुग्ण आढळून आले आहे. येथे संसर्गावर नियंत्रण आणणे अवघड आहे. मात्र यासाठी तेथे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. भारतात प्राण्यांनाही धोका? दिल्ली प्राणिसंग्रहालयात वाघिणीचा मृत्यू मुंबईत माहेरी राहून भिवंडीत सासरी आलेल्या आईसह दोन मुलांना कोरोनाची लागण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.