मुंबईत माहेरी राहून भिवंडीत सासरी आलेल्या आईसह दोन मुलांना कोरोनाची लागण

मुंबईत माहेरी राहून भिवंडीत सासरी आलेल्या आईसह दोन मुलांना कोरोनाची लागण

भिवंडी शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शहरात आढळलेल्या सर्व रुग्णांमागे ट्रॅव्हल हिस्ट्री आहे.

  • Share this:

भिवंडी, 24 एप्रिल: मुंबई येथे माहेरी राहून भिवंडीत सासरी आलेल्या आईसह दोन मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. आता भिवंडी शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 18 वर पोहोचली आहे.

भिवंडी शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शहरात आढळलेल्या सर्व रुग्णांमागे ट्रॅव्हल हिस्ट्री आहे. त्यामुळे शहरात बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश नाही, म्हणणाऱ्या पोलिसांची नाकाबंदी कुचकामी ठरल्याचे स्पष्ट झालं आहे. भिवंडी शहरात शुक्रवारी 3 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांनी दिली आहे .

हेही वाचा.. कोरोनाच्या उपचारासंदर्भात मोठी बातमी, महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपीला मंजुरी

मुंबईतील दहिसर (पूर्व) येथे माहेर असलेली महिला एक महिना माहेरी वास्तव्य करून 15 एप्रिलला भिवंडी शहरातील तांडेल मोहल्ला येथील सासरी आली होती. याबाबत समजताच भिवंडी महानगरपालिका आरोग्य विभागास समजताच या तिघांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी हाफकीन इन्स्टिट्यूटमध्ये पाठवण्यात आले होते. महिला (वय-30) मुलगा ( वय-12) व मुलगी (वय-2) या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झालं आहे. त्यांच्या संपर्कातील 7 जणांना टाटा आमंत्रण येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले असल्याची माहिती आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी दिली आहे .

या तीन रुग्णांव्यतिरिक्त वडाळा येथील महिला आपल्या तीन मुलांना घेऊन भिवंडी शहरातील गुलजार नगर येथील माहेरी 19 एप्रिल रोजी आली होती. त्यांनाही क्वारंटाईन केल्यावर त्यापैकी 7 वर्षीय मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तिच्या संपर्कात आलेल्या 2 व्यक्तींना टाटा आमंत्रण येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले आहे.

हेही वाचा.. 4 तास मुलं टाहो फोडत रडत होती, पण वडिलांच्या अंत्यविधीसाठी कोणीही आलं नाही!

शुक्रवारी आढळून आलेल्या 3 रुग्णां नंतर भिवंडी शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे. मूळचे मुंबई निवासस्थान असलेले परंतु लॉकडाऊन काळात भिवंडी शहरात दाखल झालेले एकूण 3 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यांच्यावर स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती कोविड-19 रुग्णालयात उपचार सुरू असले तरी त्यांची नोंद मूळ वास्तव्याचे ठिकाण मुंबई येथे होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली आहे .

नाकाबंदी ठरली कूचकामी

भिवंडी शहरात आढळलेल्या 10 रुग्णांमागे ट्रॅव्हल हिस्ट्री आहे. त्यामुळे लॉकडॉऊनमध्ये शहरात केलेली नाकाबंदी व त्यासाठी चोवीस तास असलेला पोलिस बंदोबस्त हा फोल ठरत असल्याचे बोलले जात आहे. या रुग्णांना शहराबाहेरच रोखलं असतं तर शहरात एकही रुग्ण आढळून आला नसता, अशीही चर्चा सुरु आहे.

हेही वाचा...पशुधन वाऱ्यावर सोडून पशुवैद्यकीय अधिकारी करत आहे टेम्प्रेचर मोजण्याचे काम!

या व्यतिरिक्त माहीम येथील पती-पत्नी व वडाळा येथील एक असे 3 रुग्ण हे मुळचे मुंबई येथील असून ते भिवंडी शहरातील नातेवाईकांकडे आले होते. त्याची वेळीच माहिती महानगरपालिका आरोग्य विभागास कळल्याने या संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन तपासणी केल्याने पुढील संसर्ग टाळता आला आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 24, 2020, 6:23 PM IST

ताज्या बातम्या