नवी दिल्ली, 24 एप्रिल : दिल्ली प्राणिसंग्रहालयात एका 14 वर्षीय वाघिणीचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या वाघिणीच्या रक्ताचा नमुना कोरोना (Coronavirus) चाचणीसाठी बरेलीला पाठविण्यात आला आहे.
प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय वाघिणीचे नाव कल्पना असं आहे. बुधवारी वाघिणीची किडनी काम करणं बंद झाल्याने तिचा मृत्यू ओढावला. दुसऱ्या दिवशी तिचा अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. बरेलीला वाघिणीचा रक्ताचा नमुना कोरोनाच्या तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. बुधवारी साधारण 6.30 मिनिटांनी वाघिणीचा मृत्यू झाला. वाघिणीच्या अंत्यसंस्काराच्यावेळी सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते.
Tigress dies at Delhi Zoo, sample sent for corona testing at Bareilly Read @ANI Story | https://t.co/ZjLVJBTIW2 pic.twitter.com/Mo23SH0D34
— ANI Digital (@ani_digital) April 24, 2020
अमेरिकेतील 9 वर्षांच्या वाघाला कोरोना लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर National Tiger Conservation Authority (NTCA)यांनी सविस्तर पत्र Wildlife Warden च्या प्रमुखांना पाठवलं आहे. यामध्ये कोविड -19 च्या लक्षणांविषयी विचारणा करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यातील धोका रोखता येईल. यापूर्वी न्यूयॉर्क शहरातील ब्रॉक्स प्राणिसंग्रलायात चक्क एका वाघाला कोरोनाची लागण झाली होती. प्राण्यांना कोरोनाची बाधा होण्याचे हे जगभरातील पहिले प्रकरण आहे. 27 मार्च रोजी नदिया नावाच्या वाघाला कोरोनाची लागण झाली होती. प्राणिसंग्रहालयातील एखाद्या कर्मचाऱ्यामुळेच या वाघांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे.
संबंधित -..अन्यथा कोरोनारुग्णांची संख्या गेली असती 73000 वर; महत्त्वाचं कारण केलं उघड
कोरोना योद्ध्यांवर हल्ला केलेले 5 जणं पॉझिटिव्ह; तुरुंगातून रुग्णालयात रवानगी
आनंद महिंद्रांनी रिक्षाचालकाचं केलं कौतुक, कोरोनाच्या संकटात थक्क करणारी कल्पना
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india