...अन्यथा कोरोनारुग्णांची संख्या गेली असती 73000 वर; रुग्णवाढीचा वेग कमी असल्याचं कारण उघड

...अन्यथा कोरोनारुग्णांची संख्या गेली असती 73000 वर; रुग्णवाढीचा वेग कमी असल्याचं कारण उघड

गेल्या 28 दिवसात 15 जिल्ह्यांमध्ये आणि गेल्या 14 दिवसात 80 जिल्ह्यांमध्ये एकही नवीन रुग्ण सापडला नाही

  • Share this:

नवी दिल्ली, 24 एप्रिल : देशात एका बाजूला कोरोना (Covid -19) रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे दिलासादायक बातम्या समोर येत आहेत. देशात गेल्या 24 तासांत कोरोना (Coronavirus) संसर्ग झालेले 419 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. याशिवाय देशातील एकूण 4749 रुग्णांची प्रकृती बरी झाली आहे.

जर केंद्र सरकारने लॉकडाऊन (Lockdown) लागू केला नसता, तर देशातील कोरोनाची रुग्णसंख्या तब्बल 73000 पर्यंत पोहोचली असती. मात्र देशात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आहे, अशी माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ते म्हणाले, 23 मार्चपूर्वी कोरोना व्हायरस संक्रमणाची प्रकरणं दुप्पट होण्याचा कालावधी 3 दिवसांवर आला होता. त्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आला. देशात कोरोनाबाधितांची संख्या 23000 पर्यंत पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासात 1684 नवे रुग्ण दाखल करण्यात आले आहेत.

त्यानंतर चांगला परिणाम दिसायला लागला. 29 मार्च रोजी प्रकरण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 5 दिवसांवर आला. त्यानंतर 6 एप्रिल रोजी देशात प्रत्येक 10 दिवसात कोरोनाची प्रकरणे दुप्पट होत आहेत. जर देशात लॉकडाऊन लागू केला नसता तर देशात कोरोनाचे 73400 केसेस समोर आले असते. गेल्या 28 दिवसात 15 जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्ण समोर आलेला नाही. त्याशिवाय आतापर्यंत 80 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नवीन रुग्ण सापडला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.

संबंधित -आनंद महिंद्रांनी रिक्षाचालकाचं केलं कौतुक, कोरोनाच्या संकटात थक्क करणारी कल्पना

First published: April 24, 2020, 6:19 PM IST

ताज्या बातम्या