बंगळुरु, 24 एप्रिल : बंगळुरुच्या पदारायणपुरा भागातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याच्या आरोपाखाली गेल्या आठवड्यात 5 जणांना अटक करण्यात आली होती. मात्र तुरुंगातून त्यांची थेट रुग्णालयात रवानगी करण्यात आली आहे.
पदारायणपुरामधील आरोग्य आणि पोलीस कर्मचारी यांच्यावर हल्ला करणाऱ्याच्या आरोपाखाली 19 एप्रिल रोजी एकूण 126 लोकांना अटक करण्यात आली होती. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रामनगर येथील एका तुरुंगात पाठविण्यात आले.
उपमुख्यमंत्री डॉ. सी एन अश्वथ नारायण यांनी सांगितले की, आम्ही सर्व कैद्यांची तपासणी केली आहे. त्यापैकी 5 जणांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली आहे. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आरोग्य कर्मचारी कोरोना (Covid -19) व्हायरसचा संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन करण्यासाठी गेले होते. तेथे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये या पाच जणांचाही समावेश होता.
देशातील कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना तातडीने क्वारंटाइन करणं आवश्यक आहे. कोरोना रोखण्यासाठी ही साखळी तोडणं आवश्यक आहे. यासाठी विविध विभागातील वैद्यकीय कर्मचारी नागरिकांचे याबाबत प्रबोधन करीत आहेत. मात्र अनेक भागात त्यांच्यावर हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशावेळी नागरिकांनी कोरोना योद्धा आपल्याला लागण होऊ नये यासाठी झटत आहेत, याची जाण ठेवायला हवी. अन्यथा कोरोनाला देशाबाहेर करणे अवघड ठरू शकते. यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे.
संबंधित - आनंद महिंद्रांनी रिक्षाचालकाचं केलं कौतुक, कोरोनाच्या संकटात थक्क करणारी कल्पना
अमेरिकेत मृत्यूचा तांडव! कोरोनामुळे 50000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू, 15000 गंभीर
वर्दीसह आईचंही कर्तव्य बजावतेय कोरोना योद्धा, बाळाला कडेवर घेऊन करतेय ड्यूटी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india