मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /...तर आम्हाला आमची भूमिका वठवावी लागेल, नितीन राऊतांचा अजित पवारांना इशारा

...तर आम्हाला आमची भूमिका वठवावी लागेल, नितीन राऊतांचा अजित पवारांना इशारा

'मागासवर्गीय अधिकाऱ्यांचे अधिकार हिरावून घेऊ नये, निर्णय घेताना परस्पर घेऊ नये, ही आमची भूमिका आहे'

'मागासवर्गीय अधिकाऱ्यांचे अधिकार हिरावून घेऊ नये, निर्णय घेताना परस्पर घेऊ नये, ही आमची भूमिका आहे'

'मागासवर्गीय अधिकाऱ्यांचे अधिकार हिरावून घेऊ नये, निर्णय घेताना परस्पर घेऊ नये, ही आमची भूमिका आहे'

मुंबई, 20 मे: महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Government) पदोन्नती आरक्षणाच्या (Promotion reservation GR) मुद्द्यावरून काँग्रेस (Congress) विरुद्ध राष्ट्रवादी (NCP) असा संघर्ष परत एकदा दिसू लागला आहे. पदोन्नती आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने 7 मे रोजी काढलेला अध्यादेश तात्पुरती स्थगिती लवकरच मिळेल जर ही स्थगिती दिली गेली नाही तर आम्हाला देखील आमची भूमिका योग्य पद्धतीने मांडावी लागेल असा कडक इशारा काँग्रेसचे नेते ऊर्जामत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव न घेता दिला आहे.

अजित पवार यांच्या समवेत नितीन राऊत, वर्षा गायकवाड यांची पदोन्नती आरक्षणाच्या संदर्भात एक बैठक झाली. या बैठकीमध्ये राऊत यांनी तात्काळ सात मेच्या पदोन्नती आरक्षणाचा जीआरला स्थगिती द्यावी, अशी भूमिका घेतली आणि तशा स्वरूपाचे विधान देखील प्रसारमाध्यमात केले. यानंतर अजित पवार यांच्या कार्यालयाकडून देखील 7 मे रोजीच्या जीआरला तात्पुरती स्थगिती दिली गेली नसल्याचे सांगत नितीन राऊत यांना दणका देण्यात आला.

शाहरुख खानच्या टीमचा मोठा निर्णय! एका भारतीयासह चौघांना वगळले

यानंतर अजित पवार आणि नितीन राऊत असा संघर्ष समोर आला. आज नितीन राऊत यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना थेट अजित पवार यांचे नाव न घेता इशारा दिला आहे. 'राज्य सरकार स्थापन करताना कॉमन मिनिमम प्रोग्राम आयोजित केला होता. यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्याचे देखील चर्चा करण्यात आली होती. यामुळे राज्य सरकार जर वेगळी भूमिका घेत असेल तर आम्हाला आमची भूमिका वठवावी लागेल, असा इशाराच राऊत यांनी दिला.

'मी छत्रपतींचा वंशज, मला कोणी शिकवण्याची गरज नाही' संभाजीराजे कडाडले

'मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहेच पण त्याच वेळी मागासवर्गीय अधिकारी यांचे अधिकार हिरावून घेऊ नये, निर्णय घेताना परस्पर घेऊ नये, ही आमची भूमिका आहे, असे म्हणत अजित पवार यांचं नाव न घेता नितीन राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

7 मे रोजी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने काढण्यात आलेला पदोन्नती आरक्षणाच्या बाबत मागासवर्गीय आरक्षण कायम न ठेवता सरसकट खुल्या वर्गातील लोकांना प्रमोशन देण्याची भूमिका घेतली आहे. वास्तविक भाजप सरकारने यापूर्वी अध्यादेश काढताना मागासवर्गीय अधिकारी प्रमोशन याचा कोटा राखीव ठेवला होता. पण आता जीआर काढताना मात्र तसे केले नाही अशी नाराजी देखील राऊत यांनी स्वतःच्या सरकारवर बोलून दाखवली आहे.

First published:

Tags: Ajit pawar, Congress, Mumbai, NCP, Nitin raut